पोस्ट्स

शेती मधे नविन मार्ग तयार करा.... मिलिंद जि गोदे

 नमस्कार मंडळी मी मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत माझ्या हा लेख वाचाल यांची मला पुर्णतः खात्री आहे. आपली शेती पुर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. आपल्या शेतकऱ्यांचे काही आर्थिक व्यवहार आपल्या शेतीतुन निघणार्या पिकावर अवलंबून असतात.आपला शेतकरी वर्ग आपआपल्या भागात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात. काही पिके भौगोलिक क्षेत्रानुसार चांगल्या प्रकारची उत्पन्न देणारी असतात तर काही पिके कमी प्रमाणात उत्पन्न देणारी असते. आणि आपला शेतकरी वर्गाला काही पिकांना खर्च जास्त करावा लागतो तर काहीना पिकांना कमी करावं लागतं. कधी कधी शेती मधे केलेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात खुप तफावत आढळत असल्याने शेतकऱ्यांचीआर्थिक समस्या वाढत जाते. म्हणून प्रत्येक प्रगतशील शेतकऱ्याने दूरदृष्टीचा अवलंब केला पाहिजे. केलेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात तफावत का येते याची माहिती समजाऊन घेतली पाहिजे व आपला शेती वर लागणारा अनावश्यक खर्च टाळणे देखील यात तेवढेच महत्वाचे आहे.आपल्याला माहिती असेल काही वेळेस शेतकऱ्यांच्या होणार्या आत्महत्येमागे केवळ कर्ज आहे म्हणून आत्महत्या केली हेच कारण नसते तर त्यामागे कौटुंबिक वाद, सामा...

शेती मध्ये नवयुवक महत्वाचे

 नमस्कार मंडळी मी मिलिंद जि गोदे आपल्या साठी थोडं पण महत्वाचे विषय आहे सेंद्रिय शेतीचा आजच्या शेती मधे नवयुवकांची भूमिका फार मोलाची आहे हि माहिती जेवढी लवकर जाणवेल तेवढे चांगले आहे. कारण आजवर शेती जी केली जाते ती जास्तीत जास्त पारंपारिक व ढोबळमानाने. सध्याच्या तसेच यापुढील कालावधीत शेती हि पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींची सांगड घालणे महत्वाच व आवश्यक आहे. काही गोष्टी शेती मधे अश्या असतात त्या पारंपारिक पद्धतीने करणे गरजेचेच असते. त्यातून चांगला लाभ होण्यास मदत होते. तर काही गोष्टी आधुनिक पद्धतीने केल्यास त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आपल्या साठी आर्थिक दृष्ट्या काही गोष्टी समजणे अधिक महत्वाचे आहे. मोठे तज्ञ म्हणतात कि, ज्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते तो देश अप्रगत असतो किंवा प्रगती करण्याच्या वाटेवर असतो. तसेच ज्या देशाची अर्थव्यवस्था औद्योगिक गोष्टींवर अवलंबून असते तो देश प्रगत असतो. असे असताना हि गोष्ट देखील खोडून काढली जावू शकते. ज्या वेळी तरुण पिढी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास प्राधान्य द्यायला सुरुवात करेल.  तरुण पिढीमध्ये क्रांती करण्याची क्षमता जास्त असत...

शेती माहितीचा खजिना म्हणजे वृक्षायुर्वेद.... मिलिंद जि गोदे*

 *शेती माहितीचा खजिना म्हणजे वृक्षायुर्वेद.... मिलिंद जि गोदे* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे आज थोडं महत्वाच आहे ही माहिती शेतकऱ्यांनी शेती कशी करावी व कोणत्या प्रकारची करावी ती माहिती या लेखामध्ये आहे. शेतकरी मित्रांनो ही सर्व माहिती मी वृक्षायुर्वेद या ग्रंथातुन घेतली आहे. आपले पुर्वज ऋषि, मुनी यांनी आपल्या साठी खुप महान वृक्षायुर्वेद हा ग्रंथांची निर्मिती केली सहाव्या शतकात वराहमिहिरांनी बृहत्संहितेत समुद्रशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि धनुर्विद्यावर जे लिहिले, त्यातीलच एक ग्रंथ होता वृक्षायुर्वेद! जे लिहिले सुरपालांनी. अर्थात त्यापूर्वीही वृक्षशास्त्रावर बरेच काही लिहिले गेले होते. सारंगधर ऋषींनी तेराव्या शतकात सारंगधर पद्धती लिहिली होती.प्राचीन काळातील ऋषी मुनी कोणत्याही ग्रंथाचा प्रारंभ गणेशवंदनानेच करीत असत. कारण ग्रंथलेखन ही देखील पूजेइतकीच पवित्र व महत्त्वाची बाब होती आणि श्रीगणेश सर्वच मंगल कार्यांचा देव मानला जाई.गणेश वंदनाबरोबरच ऋषीमुनींनी वृक्षांचा महिमा वर्णन करताना असे सुचविले आहे की, १० पुत्रांना जन्म देण्यापेक्षा १५ वृक्ष लावणेच श्रेयस्क...

नत्र चक्र निसर्ग हा जिवाणुच्या मदतीने चालवतो....... मिलिंद जि गोदे

 *निसर्ग हा जिवाणुच्या मदतीने चालवतो नत्राचे चक्र....... मिलिंद जि गोदे*  नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे आज थोडा वेगळा विषय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या निसर्गात आढळणारी एक अद्भूत गोष्ट अशी की हवेत नत्राचे प्रमाण ७९ टक्के असूनही तो आपल्या पिकांना प्रत्यक्ष उपलब्ध होऊ शकत नाही. त्यासाठी वनस्पतीला सूक्ष्म जिवाणूंची मदत घ्यावी लागते. पिकांना नत्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंना नत्र स्थिर करणारे जिवाणू म्हणून संबोधितात. हे जिवाणू नायट्रोजनेज नावाच्या संप्रेरकाची निर्मिती करून वायू रुपातील नत्राचे अमोनिया स्वरुपात रूपांतर करून तो पिकांना उपलब्ध करून देतात.मातीत वास्तव्य करणारे रायझोबियम व ब्रेडीरायझोबियम समूहातील नत्र स्थिर करणारे सूक्ष्म जिवाणू द्विदलवर्गीय पिकांच्या मुळांत प्रवेश गाठी निर्माण करतात. या गाठींमध्ये रायझोबियम जिवाणू सुरक्षित राहून वनस्पतीकडून अन्नरस शोषून घेतात व त्या बदल्यात नायट्रोजनेज विकराच्या सहाय्याने हवेतील मुक्त नत्र गाठीत स्थिर करतात. त्याचा पिकांना उपयोग होतो. द्विदल पिकांच्या गाठीचे अवशेष जेव्हा जमिनीत कुजतात तेव्हा...

माती परीक्षण म्हणजे शेती ची गुरूकिल्ली.... प्रा.प्रमोद.न.मेंढे सर

 *माती परीक्षण म्हणजे शेती ची गुरूकिल्ली.... प्रा.प्रमोद.न.मेंढे सर* नमस्कार शेतकरी मंडळी मि प्रा. प्रमोद न मेंढे. कृषी विज्ञान केंद्र घातखेड. अमरावती.  शेतकरी बांधवांनो आपली जमीन कशी आहे तिची सुपीकता अथवा उत्पादनक्षमता काय दर्जाची आहे, तिच्यात दोष काय आहेत व त्यात कोणत्या सुधारणा करणे जरूर आहे, हे व अशा तऱ्हेचे प्रश्न अनेक शेतकरी मंडळी च्या मनात थैमान घालीत असतात. सुधारलेल्या पद्धतीने शेती करणाऱ्या सर्व पाश्चात्य राष्ट्रात जमिनीची अधून मधून तपासणी करून घेणे ही एक आवश्यक बाब मानली गेली असून त्यासाठी सरकारी व निमसरकारी पातळीवरून मोफत अथवा माफक फी आकारून जमिनीची तपासणी करून योग्य तो तांत्रिक सल्ला देणाऱ्या योजना अतिशय लोकप्रिय, उपयुक्त ठरल्या आहेत. जमिनीचा कस किती आहे याचा अंदाज घेण्यासाठी, खताचे प्रमाण ठरविण्यासाठी व इतर आवश्यक काळजी घेण्यासाठी व क्षार कमी करणे, जमिनीचा चोपणपणा कमी करणे, निचऱ्याची सोय करणे, चुना वापरणे वगैरे मातीची तपासणी ही एक गुरुकिल्लीच आहे. या किल्लीचा उपयोग करून उत्पादन वाढविणे सहज शक्य आहे. खतांचा वापर केला म्हणजे उत्पादन वाढते ही गोष्ट सामान्य शेतकऱ्याला...

पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....

 *पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...

जैविक पद्धतीचा अवलंब केला तर पिकावरिल समस्या आपोआप बदलेल

 *जैविक पद्धतीचा अवलंब केला तर पिकावरिल समस्या आपोआप दुर होईल.... मिलिंद जि गोदे*  नमस्कार मंडळी मी मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आपली हजारों वर्षांपासूनची शेतीपरंपरा ही आपल्या पुर्वजानीं सांभाळून ठेवली आहे व जोपासली होती. त्यातच त्यांच्या आरोग्याचे रहस्य आहे. जमिनीची सुपिकता नैसर्गिकरित्या टिकवण्याच्या पारंपारिक पध्दतीला ही मंडळी आजही चिकटून आहेत. कुठलाही आधुनिक विचार किंवा आधुनिक तंत्राची शेती ते स्वीकारायला तयार नाहीत. कारण त्यांच्या शेतामध्ये पिकवली जाणारी अन्नधान्याची प्रत व चव इतरांपेक्षा वेगळी आहे. या शेतीपध्दतीत पिके, जनावरे व मानवी टाकाऊ वस्तू व पदार्थ पूर्णपणे कुजवून नंतरच शेतीत टाकले जातात. पिकाऊ क्षेत्र करून, लोकसंख्या भरपूर तरीही या लोकांना आजच्या परिस्थितीत काहीच कमी पडत नाही. साहजिकच पिके चांगली राहतात व वाढतात. कुठल्याही प्रकारची रोगराई दिसत नाही. यालाच परिपूर्ण शाश्वत शेती तंत्र म्हणावे लागेल. कारण हे लोक साठ मैल एका दमात पायी प्रवास करून त्याच दिवशी आपल्या घरी परततात. अशी शारीरिक क्षमता आजतरी कोणत्याही जमातीत शिल्लक नाही. प्राणवायू, शुध्द हवा, सूर्य...