पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेती व माती ..... मिलिंद जि गोदे

मातीचे शोषण नाही तर पोषन करा! मिलिंद जि गोदे नमस्कार मित्रांनो हा लेख आपल्या शेती मातीशी निगडित आहे आपन आपल्या जमिनीत उत्पादन घेत आहोत तिचा पोत राखण्यात आपण कोठे तरी कमी पडत आहे. बेसुमार रासायनिक खते व किटक नाशकांमुळे उत्पादनात वाढ झाली खरी पण नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची आपल्या जमिनीची गरज पूर्ण होऊ शकत नाही. ज्यामुळे जमिनीचा पोत टिकण्यास मदत करणारे सेंद्रिय पदार्थ जमीनीत टाकण्याचे प्रमाण कमी झाले. जमिनीचे आरोग्य बिघडण्यास मदत झाली. सुपीक असलेल्या जमिनी आता नापीक होत गेल्या यांचे कारण काय असु शकते मित्रांनो आपल्या शेतात रासायनिक खतांच्या असंतुलीत व बेसुमार वापरामुळे जमिनीत जैविक घटकांचा विनाश होऊन जमिनी मृत झाल्या. खतांची कार्यक्षमताही कमी झाली. कमी कार्यक्षमतेमुळे पुन्हा वाढीव वापर आणि पुन्हा जमिनीचा ऱ्हास दृष्टचक्रात आपल्या नविन उत्पादन पध्दती मधे अडकलेल्या आहे. तिचे एक प्रकारे शोषन झालं मला शेतकर्याना हेच सांगायचे आहे की माती बाबत जागरूकता निर्माण करणारी यंत्रणा तयार व्हावी.वेळोवेळी मातीचे महत्व हे शेतकरी यांना समजावून सांगणे.जमीन, जमिनीची उत्पादन क्षमता ही निसर्गाची देणगी आहे...

Soil information 🙏

मातीमधल्या जिवाणूंना संपवायचं नाही संवर्धन करायचं आहे! ........ मिलिंद जि गोदे........ नमस्कार आजच्या लेखात आपल्याला जिवाणू संवर्धनाची गरज का आहे हे वाचायला मिळेल.आजच्या काळात शेतकरी मित्रांनो उत्पादन जास्तीत जास्त कसे घेऊ ही जणु काही स्पर्धा लावलेली आहे असे वाटतंय शेत जमिनिचा स्तर कोठे चाललाय यांच्या वर लक्षच नाहीच आहे. जमिनीचां नैसर्गिक जो गुणधर्म आहे तो बिघडत चालले आहेत. मातीमधला घट्टपणा वाढत चालला हे लक्षण दिसत आहे. त्या मधे जमिनींचा सामू वाढत आहे. जमिनींची मोठी धूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जमिनी क्षारयुक्त आणि चोपण बनण्याच्या समस्याही वाढत आहेत. मातीतील सुपीकता व कच खालावत चालल्यामुळे खतांवरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. जमिनीची सुपीकता हा जमिनींचा बदलत जाणारा गुणधर्म आहे हे लक्षणे जिवाणू चे संवर्धन नसल्यामुळे झाले आहे. हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.आज जर मातीमधले जिवाणू वाचवली तर जिवाणू आपल्याला मातीत जाण्यापासून वाचलेलं ! जीवाणू संवर्धन म्हणजेच जीवाणू खते ज्यात नत्र उपलब्ध करून देणाऱ्या व जमिनीतील स्फुरद विरघळविणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंच्या गटाचे मिश्रण असते. वनस्पती सें...

Agri blog

नमस्कार मित्रांनो मि मिलिंद जि गोदे आपला शेतकरी वर्ग शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. गावातील लोकांची उपजिविका म्हणजे शेती व्यवसाय सर्व शेतीवर अवलंबून आहे.त्या मध्ये बरेचसे शेती क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खात्रीशीर उत्पादन मिळण्याची हमी नसतेच. मर्यादित जमिनीचे क्षेत्र उपलब्‍ध असल्याने आणि सिंचनाच्या सुविधा मुबलक नसल्याने याच क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. तुमच्या लक्षात येईल की माती पिकाच्या मुळाला आधार,अन्न पुरविणारी यंत्रणा म्हणजे जमीन होय. तिच मुलद्रव आणि पाणी पुरवठा करण्याचे काम करत असते.जमिनीला जिवतं करण्याचें काम अहोरात्र कोट्यवधी जीवाणू अभिक्रियांद्वारे मातीच्या जडण घडणाचे काम करतात. म्हणून माती हे सजीव माध्यम आहे. कोट्यवधी सूक्ष्म जिवाणूंनी समृद्ध, पोषक अन्नद्रव्ये, हवा आणि पाणी असा सुवर्ण संगम साधलेले माध्यम म्हणजे माती हेच मानवी संस्कृतीच्या विकासाचे उगम स्थान आहे. म्हणून मातीला आपल्या काळी आई म्हणुन संबोधले जाते. शेतीसाठी तर मातीचे महत्त्व फारच आहे हे आपणास माहीत आहेत.ज्या मातीत ४५ टक्के मातीचे कण, २५ टक्के पाणी, २५ टक...

शेती व शेणखत

नमस्कार मंडळी वाचाल तर वाचाल थोडं विश्लेषण करु शेणखतावर शेती साठी शेणखत का आहे महत्वाचे ? शेणखताची परीभाषा काय आहे? तत्पूर्वी शेती साठी शेणखत हा अन्न निर्माण करणारी यंत्रणा आहे.हे लक्षात आले कि सर्वच लक्षात येईल.मित्रहो नियमित शेणंखत वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होतात. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती तसेच वहनदेखील चांगल्याप्रकारे होते. बरेचसे शेतकरी शेतात शेणखत अगदी सहजपणे मिसळून निवांत राहतात. परंतु शेणखताबरोबरच इतर स्रोतांपासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचा देखील वापर करावा लागतो. शेणखत हे जमिनीच्या आरोग्यासाठी एक प्रकारे पूरक म्हणून कार्य करते.शेणखतामधून अन्नद्रव्यांचे मिळणारे प्रमाण रासायनिक खतांच्या तुलनेत फारच अत्यल्प असते. परंतु सेंद्रिय पदार्थांचा अंतर्भाव जास्त असल्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण जमिनीत तयार होते. परीनाम खुप चांगले दिसतात.त्यामुळे जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध करण्यास मदत करणारे जिवाणू जसे ऍझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळवण्यास मदत क...
*नमस्कार मित्रांनो सेंद्रीय कार्बन म्हणजे काय ?* सेंद्रीय कर्ब म्हणजे पिकांच्या पानांनी म्हणजे पिकांच्या पानरूपी इंद्रीयांनी प्रकाश संश्‍लेषणच्या मध्यमातुन हवेतुन घेतलेले कार्बन होय. *सेंद्रीय कर्बाचे प्रकार पाहू* 1) उडनशील कर्ब वोलाटार्इल कार्बन 2) अस्थिर कर्ब अनस्टेबल कार्बन 3) स्थीर कर्ब स्टेबल कार्बन *1) उडनशील कर्ब वोलाटार्इल कार्बन* कोणतेही अंतरपिक फुलोरयावर येणाच्या आधी कापून आच्छादन करतो ते आच्छादन कुजून जो कर्ब मोकळा होतो त्या कार्बनला पळपुट्टया कार्बन म्हणतात. हा कार्बन ह्युमस मध्ये कधीच जमा होत नाही व हवेत निघून जातो व वातावरणाचा तापमान वाढवतो. त्यामुळे फुलोऱ्याच्या काळात आच्छादन करू नये. 2) अस्थिर कर्ब अनस्टेबल कार्बन कोणताही अंतरपिक फुलावर आल्यानंतर ते कापून आच्छादन केले तर त्यामध्ये अस्थिर कर्ब असतो. तो कधीच ह्युमस मध्ये जमा होत नाही पण हा कर्ब ताबडतोब मुक्त होत नाही काही वेळांनी मुक्त होतो व हवेत निघून जातो म्हणुन हा अस्थिर कर्ब आपल्या कामाचे नाही म्हणुन कोणतेही अंतरपिक फुलोरयावर कापू नये. 3) स्थीर कर्ब स्टेबल कार्बन हा स्थिर कर्बच फक्त ह्युमस मध्ये जमा होतो. ह्याच्यामुळ...

Milind gode agriculture

नमस्कार मित्रांनो वनस्पतींना किंवा पिकांना एकुण दोन प्रकारच्या मुळ्या असतात. 1) पांढरी मुळी 2) काळी किंवा लालसर रंगाची मुळी 1) पांढरी मुळी:- पांढरी मुळी ही वनस्पतीचा मुख्य भाग आहे.या मुळीस काही ठिकाणी केशमुळ देखिल म्हणतात. ह्या मुळीचा शेंड्याकडील बराच भाग हा पांढरा असतो. म्हणून ह्या मुळीला पांढरी मुळी म्हणतात. ह्या मुळीचे मुख्य कार्य म्हणजे जमिनितील अन्न व पाणी शोषणे होय. म्हणून या मुळीस वनस्पतीचे खाणारे तोंडदेखिल म्हणतात. ज्या पिकामध्ये पांढरया मुळांची संख्या जास्त म्हणजे खाणारी तोंडे जेवढी जास्त तेवढ़े त्या पिकांची उत्पादन जास्त व पिके सुदृढ असतात.अशा पीकामध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त असते. वनस्पतींच्या पांढरी मुळीच्या तोंडाजवळ जेवढे अन्न किंवा खत येईल तेवढेच खत किंवा अन्न सदर मुळी शोषण करीत असते. दूरचे अन्न किंवा खत सदर मुळ शोषून घेऊ शकत नाही म्हणून जेवढया पिकास पांढरया मुळ्या जास्त तेवढे पिक जास्त अन्न शोषण करीत असते व तेवढे पिक सशक्त व पिकांचे उत्पन्न जास्त असते. 2) काळी मुळी:- या काळ्या मुळीस काही ठिकाणी निबर किंवा कठिण मुळी म्हणतात. काळी मुळी ही पांढरया मुळीच्या आकाराच्या मा...