पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेती व जिवाणू चे काम

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना पडलेला एक सर्वसाधारण प्रश्न असतो की ही कृषी तंत्रज्ञान सांगते की जमीन तर जिवंत आहे तर उन्हाळ्यात एवढ्या उन्हात जिवाणू जातात कोठे व त्या जीवाणू चे काय होते किंवा मरत का नाही परंतु ते असे होतच नाही. कारण उन्हाळ्यामध्ये जीवाणू हे सुप्तावस्थेत जातात खूप पाऊस पडला की पुन्हा जिवाणू आपल्या अवस्थेत ऍक्टिव होतात. पहीला मृगाचा पहिला पाऊस पडला की आपल्याला मातीचा वेगळाच वास येतो कारण हे जीवाणू त्यांच्या शरीरातून काही हर्मोंस श्रवतात व कार्यरत होतात. हे सर्व नैसर्गिक आहे. आपण एक उदाहरण घेऊ, समजा उन्हाळ्यात एखाद्या पिकाची लागवड केली आणि जमिनीत पाणी दिले तर असा वास येत नाही कारण जोपर्यंत नैसर्गिकरीत्या वातावरण तयार होऊन पाऊस पडत नाही तोपर्यंत या प्रकारचा वास येत नाही हा निसर्गाचा नियम आहे. आता आपण उपयुक्त जीवाणूचे फायदे कोणते ते बघूया झाड हे खत तसेचे तसे घेऊ शकत नाही त्यासाठी त्या खतावर जीवाणू मार्फत प्रक्रिया होऊन ते खत उपलब्ध स्वरूपात जिवाणू तयार करतात व ते उपलब्ध स्वरूपातील अन्न हे पीक घेतात. आपण दिलेल्या रासायनिक खतांचा वापर करायचा असेल तर आपली जमीन उपयुक्त जि...

जमिन चे संवर्धन

नमस्कार मंडळी आपन आपल्या शेती माय साठी दिवसान दिवस स्वार्थी होत आहे. आपन स्वत:च्या फायद्यासाठी जमिनींची अन्नसाखळी तोडत आहे. जमिनी मधिल सजिव घटक आहे त्या कडे दुर्लक्ष करत आहे. आपन ज्या प्रमाणे श्वास घेत असतो त्याच प्रमाणे जमिन सुद्धा श्वास घेत असते. आपल्याला पाऊस उन्हाची आवश्यक असते व रोग बुरशी यापासून संरक्षण गरजेचे असते तसेच जमिनींचे सुद्धा संरक्षण गरजेचे आहे.आपल्या पूर्वजांनी दिलेली ही संपत्ती पुढील पिढीकडे जशी जिवंत सोपवली आहे तशेच आपली सुद्धा एक जवाबदारी आहे व आपण तिचा सांभाळ करून येणाऱ्या पिढीला ती जिवंत स्थितीतच सोपवणे यामुळे जमिनीचीच्या सुपिकतेचे जतन आणि संवर्धन होऊन मातीचा दर्जा टिकून राहील. जमिनीचा कसदार पणा टिकला तर आपली संपती म्हणजे आपले आरोग्य टिकून राहील या मध्ये कोणतेही दुमत नाही.आपली सर्वात मोठी चुक कि रासायनिक खतांचा अतिवापरा मुळे जमिनीची सुपीकता कमी होऊ लागली आहे. परीनामी उत्पन्नात घट आणि शेती मधला उत्पादन खर्च वाढत आहे हे मान्य करावे लागेल. संकरीत बियाण्यांमुळे जे आपले पारंपरिक बियाणे यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या.आपन आपला मानवी हिताचा विचार करून सेंद्रीय व जैविक शे...

शेती तोट्यात जाण्याचे कारण

नमस्कार मित्रांनो हा लेख आपले शेती संदर्भात लेख डोळे उघडणारा आहे नक्की नक्की वाचा व अभिप्राय नोंदवा. शेती तोट्यात का चाललीय? ह्या गोष्टीचा विचार केला असता डोळ्यासमोर ३ कारणे उभी राहतात जर त्या गोष्टीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून निर्णय घेतले तर आपण आपली शेती नक्कीच उन्नती च्या मार्गावर नेऊ शकू, तर जाणून घ्या कारणे *आत्मविश्वास कमी असणे* *भीती* *अपुरे ज्ञान*. आत्मविश्वास कमी असणे म्हणजे काय मित्रांनो माश्याच्या पिल्लाला पाण्यात पोहायला कधी शिकवले जाते का? ती कला त्यांच्यात उपजतच असते त्याच प्रमाणे आपण शेतकऱ्यांची पोर शेती व्यवसाय पूर्वापार चालत आलेला, आपल्या पंजोबानी, आजोबांनी, वडिलांनी, शेती केली त्यानंतर ती परंपरा आपल्या कडे सुपूर्त करण्यात आली जितकी शेती आपण रोज बघतो, त्यातील अडचणी नित्याच्या आहेत ते प्रतिदिवशी बघत असतो तितक्या कोणीच बघत नाही, तरीही आपण ज्या सल्लागारांनी, कंपनी प्रतिनिधीने, शेतीत कधीही पाऊल दिलेले नाही त्या लोकाकडून शेती शिकतो आणि त्यांच्या म्हणण्यानुसार शेती करतो ह्याचा अर्थ असा निघतो सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात पण उमजत नाही आणि उमजत असल्या तरीही त्या ...

आज मातीला वाचवा उद्या माती तुम्हाला वाचवेल

*आपलं शेती मध्ये कुठंतरी चुकतंय!* नमस्कार मंडळी लक्षात घ्या आजचा लेख हा तुम्हाला विचार करू लावणारा आहे व माझ्या शेतकरी मित्रांसाठी आहे. शेतीमध्ये जो शेती कसतो व उत्पादन घेतो तोच शेतकरी आहे. आपल्याला शेती उत्पादन हा पूर्णपणे पूर्णवेळ करायचा व्यवसाय आहे.आपल्या सांगितले जाते आपन अमुक वान लावा उत्पादन योग्य येईल पण केव्हा उत्पादन वाढेल? जेव्हा आपली शेती जमिनीचा पोत चांगला राहील तेव्हा!आपण काय करत आहे कि जमिनीचा विचारच करत नाही आहोत. आपल्याला पुर्वजा कडुन मिळालेली सुपिक माती आता पूर्वीसारखी सुपीक राहिली नाही. कारण तिच्याकडून फक्त घेणेच चालू आहे. तिला दिला जाणारा मोबदला जसे शेणखत, सेंद्रिय खत, हिरवळीचे खत इत्यादी हे अत्यल्प किंवा देणे साफ बंदच केले आहे. आज फक्त जास्तीत जास्त उत्पादन कसे काढावे ही स्पर्धा आपन सुरू केलीआहे.सेंद्रिय खतांकडे झालेल्या दुर्लक्षांमुळे दिवसेंदिवस जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. नव‌ नवीन पद्धतीने शेती करताना अंदाजित पद्धतीने पिकांना आवश्यक घटक मूलद्रव्यांचा पुरवठा केला जातो.त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. जमिनीचे आरोग्य राखून शेती उत्पादनक्षम...

शेती नियोजन

नमस्कार मंडळी आदरणिय मेंढे सरांचे विचार आपल्या सोबत शेअर करत आहे आपन वाचाल अशी मला आशा आहे आज माती परीक्षणाची गरज का? आपल्या पीकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते . त्यापैकी एखादे जरी मातीत कमी किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम लगेचच झाडावर दिसून येतो .जसे पाने पिवळी पडणे ,पान गळणॆ ,शिरा सोडून इतर पानांचा सर्व भाग वाळून जाणॆ इत्यादी लक्षणॆ अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किवा अभावामुळे वनस्पतीमध्ये दिसून येतात .अठरा अन्नद्रव्याशिवाय पीकांची वाढ पूर्ण होत नाही . ती अन्नद्रव्ये मिळताच खुंटलेली वाढ परत सुधारते . विशेषत: या अन्नघटकांचा वनस्पती वाढीच्या एखाद्या जैविक कार्यात प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे माती परिक्षण करणॆ आवश्यक आहे .त्याद्वारे शेतक-यांना समजेल की मातीत कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमान कमी आहे किंवा जास्त आहे . मुख्य आणि महत्त्वाचा उद्देश म्हण्जे माती परीक्षणावरुन जमीनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व ती कमतरता नाहीशी करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे हे ठरवता येते. माती परीक्षण व पीक उत्पादन यांच्या संबंधावरून पीकांना जमीनीतून किती प्रमाणात अन्नद्...