शेती माहितीचा खजिना म्हणजे वृक्षायुर्वेद.... मिलिंद जि गोदे*
*शेती माहितीचा खजिना म्हणजे वृक्षायुर्वेद.... मिलिंद जि गोदे* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे आज थोडं महत्वाच आहे ही माहिती शेतकऱ्यांनी शेती कशी करावी व कोणत्या प्रकारची करावी ती माहिती या लेखामध्ये आहे. शेतकरी मित्रांनो ही सर्व माहिती मी वृक्षायुर्वेद या ग्रंथातुन घेतली आहे. आपले पुर्वज ऋषि, मुनी यांनी आपल्या साठी खुप महान वृक्षायुर्वेद हा ग्रंथांची निर्मिती केली सहाव्या शतकात वराहमिहिरांनी बृहत्संहितेत समुद्रशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि धनुर्विद्यावर जे लिहिले, त्यातीलच एक ग्रंथ होता वृक्षायुर्वेद! जे लिहिले सुरपालांनी. अर्थात त्यापूर्वीही वृक्षशास्त्रावर बरेच काही लिहिले गेले होते. सारंगधर ऋषींनी तेराव्या शतकात सारंगधर पद्धती लिहिली होती.प्राचीन काळातील ऋषी मुनी कोणत्याही ग्रंथाचा प्रारंभ गणेशवंदनानेच करीत असत. कारण ग्रंथलेखन ही देखील पूजेइतकीच पवित्र व महत्त्वाची बाब होती आणि श्रीगणेश सर्वच मंगल कार्यांचा देव मानला जाई.गणेश वंदनाबरोबरच ऋषीमुनींनी वृक्षांचा महिमा वर्णन करताना असे सुचविले आहे की, १० पुत्रांना जन्म देण्यापेक्षा १५ वृक्ष लावणेच श्रेयस्क...