पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 नमस्कार मित्रांनो मिलिंद जि गोदे या आज आपन "उत्पादनात घट" या विषयावर थोडं पण महत्वाचं आहे.आपल्या शेतीत सध्या रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिरेकी वापर सुरू आहे आपल्या शेतकऱ्यांच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे व खर्चाच्या तुलनेत उत्पादन होत नसल्याने शेतकर्‍याला तोटा हा सहन करावा लागत आहे. आपल्या सातत्याने होणार्‍या तोट्यापुढे तो टिकाव धरणे शक्य नाही. दुबार-तिबार पेरणीमुळे त्याचे कंबरडेच मोडते. शेतीपूरक व्यवसाय पुरेसा नसण्यानेही त्यांचे आर्थिक गणित बिघडते. याशिवाय शेतीवर येणार्‍या संकटांमुळे शेतकरी आत्महत्यांच्या आहारी जात आहे. शेतीवरील खर्च कसा कमी करता येईल.जमिनीचा कस कमी करण्याचे रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर हे प्रमुख कारण आहे हे लक्षात घ्यावा लागेल.तो खर्च ही निघणे कठीण असते...... विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल आपला मित्र मिलिंद जि गोदे milindgode111@gmail.com
 नमस्कार मि मिलिंद जि गोदे  पिकांसाठी शिफारस असलेले उपयोग खतमात्रा ठरविण्यासाठी केला पाहिजे. त्याच प्रमाणे खते देण्याची योग्य वेळ व पद्धतीचाही अवलंब करावा. पिकासाठी आवश्यक अन्नद्रव्ये -  नत्र - नत्र हे अन्नद्रव्याचे संतुलन चक्र असून, नत्रामुळे अन्य अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते. नविन पालवी वफुलं येण्यासाठी नत्राची आवश्यकता आहे. कळी येते वेळी पानातील नत्र हा फुलांमध्ये जातो. फुले टिकून राहतात व फळधारणा होते. नत्रामुळे झाडाची वाढ जोमाने होते. पानांचा रंग गर्द हिरवा होतो आणि अधिक उत्पादन मिळते.  स्फुरद - पिकांना नवीन पालवी फुटते. पेशीची निर्मिती होते. मुळाची भरपूर वाढ होते. फळांचा आकार मोठा होऊन उत्तम प्रतीचे उत्पादन मिळते.   पालाश :   पेशींचे विभाजन करण्यासाठी पालशची गरज असते. पालाशमुळे झाड रोगास किंवा किडीस बळी पडत नाही. पाण्याचा ताण व कडाक्याची थंडी सहन करण्याची क्षमता वाढते. फळाची प्रत सुधारते व उत्पादन वाढ होते. अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे   नत्र - झाडाची पाने व शिरा पिवळ्या पडतात. झाडाची वाढ खुंटते, झाडावर फुलं व कळ्यांचा आकार लह...

Mission agriculture information

 नमस्कार मि मिलिंद जि गोदे पिकं वाढ अवस्था साठी संप्रेरके पाहू.  संजिवकांच्या वापराने निश्चित फायदा होतो. मात्र, गुणवत्ता चांगलीच असावी. योग्य वेळीच वापर व्हावा व किंमतसुद्धा प रवडणारी असावी यासाठी ही सर्व उत्पादने तज्ज्ञां jiच्या सल्ल्याने किंवा चांगल्या विश्वासपात्र व्यक्तीच्या सल्ल्यानेच वापरावीत. यामध्ये बदल करू नये. आपण मागितलेलीच उत्पादने मिळण्यासाठी आग्रही असावे. कोणतीच दोन उत्पादने सारखी नसतात किंवा एकमेकांसारखी शक्यतोवर नसतात. त्यांच्या वापरामध्ये बदल करावयाचा असल्यास स्वतःच्या जबाबदारीवर करावा. फक्त झाड हिरवे होणे म्हणजेच चांगले रिझल्ट आले असे नाही. *क्लोरोमेकॉट क्लोराईड* क्लोसीन/लिव्होसीन या रसायनाचा उपयोग पिकाच्या कायिक वाढीचे रूपांतर फळधारणेमध्ये करण्यासाठी करतात. हे फवारल्यानंतर पिकाच्या फांद्या, उंची, पाने यांचा आकार व संख्या कमी वाढून मिळालेल्या अन्नद्रव्याचा वापर हा पाते, फुले लागण्यासाठी अन्नद्रव्य पानांमध्ये साठवण्यासाठी केला जातो. ज्यामुळे पिकाच्या अवास्तव वाढीवर नियंत्रण येते व त्याचा फायदा जास्त फूल, फळधारणेमध्ये होते. वेगवेगळ्या पिकांमध्ये लिव्होसीनचा व...