पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माती सजिव असेल तर शेती टीकेल..!.... मिलिंद जि गोदे

 नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं मि मिलिंद जि गोदे पुन्हा आपल्या सेवेत आपन शेती व माती व्यवस्थापनामध्ये तिचे आरोग्य अबाधित राखून ठेवण्या साठी किफायतशीर पीक उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक असते.आपन दरवर्षी पीक घेतल्यामुळे पिकांच्या शोषणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत जात असतो. त्यामुळे काय होते की आपल्या जमिनीची सुपिकता कमी होते. जमिनीची सुपीकता आजमावण्यासाठी भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माची तपासणी करणे आवश्यक असते. त्यासाठी माती परीक्षणाची गरज ही महत्त्वाची असते. माती परीक्षणामुळे जमिनीच्या सर्व गुणधर्माची माहिती मिळते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते आणि त्यानुसार रासायनिक खतांच्या मात्रा व शिफारसी ठरविणे सुलभ होते.माती आणि पाणी ही पिकांची संजीवनी आहे. पिकांचे अस्तित्व मातीच्या आणि पाण्याच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते. पीक उत्पादनातील सर्वात महत्त्वाचा घटक कालांतरापासून शेतकरी जमिनीत विविध पिके घेत आला आहे. पूर्वीच्या काळात सेंद्रिय पदार्थ जमिनीत साचण्याचे प्रमाण जास्त होते. साहजिकच जमिनीचा पोत टिकण...

शेती हा विषय संपुर्ण मानव सभ्यतेचा आहे.... मिलिंद जि गोदे

 *शेती हा संपूर्ण मानव सभ्यतेचा विषय आहे..... मिलिंद जि गोदे* नमस्कार शेतकरी बांधवांनो थोडं पण महत्वाचं शेती ही शेतकरी आणि शेतकऱ्यांचे मुले व शेतात काम करणारे मजूर यांच्यासाठीचा विषय आहे व शेतीशी निगडीत माहिती ही संकल्पना का झालीय शेती या विषयाची. तसे बघितले तर शेती हा व्यापक आणि प्रत्येक मानव सभ्यतेचा विषय आहे हे कधी कळणार सर्वांनाच. कारण असे प्रकर्षाने दिसून येते कि, कुणालाही शेतीसाठी माहिती घेण्याची विशेष रुची नाही च. असा समज लोकांमध्ये दिसून येतो कि शेती म्हणजे फार मेहनतीचं व अवघड काम आहे. सर्वांना या गोष्टी समजल्या पाहिजेत आपण जो भाजीपाला, फळे, धान्य पिके इतर आपन रोजच्या दैनंदिन जीवनात खातो ते जमिनीत येते कसे? या बद्दल उत्सुकता व माहिती असली पाहिजे.वर्तमानातली तरुण पिढी जेव्हा याकडे एक रुची, संधी आणि उत्तम व्यवसाय म्हणून पाहण्यास सुरुवात करेल तेव्हा शेती या क्षेत्राचे स्वरूप बदलले व उत्तम झालेले असेल. शेती हा विषय फक्त शेतकऱ्यांसाठी नाही हा विषय सर्व पृथ्वी तळावरील प्रत्येक मानव सभ्यतेचाआहे. शेती असे क्षेत्र आहे ज्यामध्ये सर्वांसाठीच मोठ्या व उत्तम संधी दडलेल्या आहेत हे सर्...

उत्पादन बाबत आपन मागासलेलं आहोत..... मिलिंद जि गोदे

 *आपन शेतीच्या उत्पादनात आपन मागासलेलेआहोत आहे* ................. नमस्कार मंडळी हि मिलिंद जि गोदे आपन आपल्या शेती ची उत्पादकता का घटली असेल या बाबत आपण जाणून घेऊ या  आपण शेती करतो पण आपल्या शेतकर्‍यांच्या शेती व्यवसायाला अभ्यासाचा आधार नसतोच हे मान्य करावे लागेल. त्यामुळे काय होते की आपल्या शेतीमधे जास्तीत जास्त किती उत्पन्न निघू शकते आणि आपण किती उत्पन्न काढतो याचा आपन कधी तुलनात्मक विचारच केला नाही. आपला भारत देश हा कृषि प्रधान देश आहे पण या देशाचा दर एकरी उत्पन्नाच्या बाबतीत जगात फार खालच्या क्रमांक वर आहे. आपन वाहतो त्या शेतीची स्थिती अनुकूल असूनही आपन अभ्यास करून व शास्त्रशुद्ध रित्या शेती केली जात नसल्याने ही अवस्था निर्माण झालेली आहे. या बाबत आपन विचार केला तर पाश्चिमात्य देशात एकरी उत्पादन आपल्या तिप्पट आहे जर ध्यानात घेतले तर आपले डोळे उघडतील. दर एकरी उत्पन्नाचं भरपूर आहे. त्यानुसार भारतात सोयाबीन एकरी उत्पादन आठ क्विंटल आहे. तेच उत्पन्न जपान मध्ये मात्र एकरी २५ क्विंटल आहे. या बाबतीत जगातल्या काही प्रमुख कृषि प्रधान देशांचा तुलनात्मक अ...

शेतकऱ्या ना आता आधुनिक शेतीसाठी शिक्षण आवश्यक आहे.....!*..... मिलिंद जि गोदे

 * नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं, शेती क्षेत्र हे मागे राहण्याचे एकमेव कारण म्हणजे न शिकलेले शेती करतात आणि शिकलेले नोकरी, शिक्षणाशिवाय शेती शक्य नाही ही एक शोकांतिका आहे. मित्रांनो शेती सारखी दूसरी कोणतीही नोकरी नाही हे लक्षात घ्या कारण आता ती काळाची गरज आहे. कारण कोणत्याही नोकरीला मालक असतो, येथे आपनच आपले आहे आहोत. वर्षातले संपुर्ण दिवस आपलेच असतात आणि येथे नोकरीमध्ये फक्त रविवार आपले असतात. नोकरीमध्ये आपण मजूर असतो कोणताही निर्णय घेणे आपल्या हातात नसते हे लक्षात घ्या. मनुष्याला जगण्यासाठी जे अन्न लागतं ते फक्त मातीतच पिकतं, आणि त्याला पिकवणारे आहोत आपण. म्हणून शेतकऱ्याना आधुनिक शिक्षण आवश्यक आहे. आपल्याला रोग,किडी, अन्नद्रव्याची कमतरता, ओळखता आली पाहिजे. शेतात फिरत असताना बारकाईने निरीक्षण करा.स्वतः स्वताच्या अनुभवातून एवढे शिका की, वेगळ शिक्षण घेण्याची आवश्यकता नसली पाहिजे. ठामपणे सांगा मी शेती करतो. आपण शेती करतो, याचा अभिमान बाळगा. विश्वास ठेवा शेती क्षेत्रात नक्कीच यशस्वी व्हाल.तर मग चला व्यावसायिक शेतकरी होण्यासाठी लागणारी सुत्रांचा आपण यावर्षी अंवलब करु या..!उत्तम व्याव...

माती अजुन सुद्धा पर्याय सापडला नाही...... मिलिंद जि गोदे

 _नमस्कार 🙏🙏मंडळी थोडं पण महत्वाचं आपल्या शेतीचा सर्वात प्रमुख आणि महत्वाचा घटक म्हणजे जमीन होय. ती म्हणजे आपल्या जमिनीतली काळी माती ही माती काही सगळीकडे सारखी नाही हे आपणास माहीत असेल येथे हर एका शेती मधे माती चा बदल दिसून येते. काही ठिकाणी ती पांढरीही आहे आणि काही भागात ती लाल ,पीवळी आहे. पण तरीही जमिनीला काळी आई म्हणतो. या पृथ्वीतलावर जमिनीत मशागत करून आणि पिके घेऊन शेती केली जाते. माणूस सुधारला आणि चंद्रावरच नव्हे तर सूर्यावर जरी गेला तरी त्याला पोटाला खायला काही तरी लागतेच. त्याने कितीही प्रगती केली तरी हे सत्य काही बदलणार नाही. त्यामुळे मानवी जीवनात कितीही बदल झाले आणि परिवर्तने झाली तरीही पोटाची खळगी कायम आहे आणि त्यामुळे शेती व्यवसाय अटळ आहे, शाश्‍वत आहे. कधी काळी या पृथ्वीतलावरची शेतीच बंद झाली आहे असे काही घडणार नाही आणि शेती हा इतका शाश्‍वत धंदा असेल तर मातीचे महत्वही अबाधित आहे. तेव्हा आपण ज्या मातीत शेती करणार आहोत ती माती नेमकी काय आहे याची नीट माहिती करून घेतली पाहिजे. प्रत्येक शेतकरी हा काही किमान शास्त्रांची माहिती असणारा शास्त्रज्ञच असतो. नसेल तर तो तसा असला पाह...

शेती व लहरी वातावरण...... मिलिंद जि गोदे

 शेती व लहरी वातावरण जाणून घ्या आणि हुशार व्हा! आज काही वेगळं सांगायच आहे.शेती हा अत्यंत प्राचीन असा व्यवसाय आहे. भुतळावरचे दोन तृतीयांश लोकांना चा अजूनही शेती व्यवसायावर उदरनिर्वाह आहे. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो असे अनेक देश जगाच्या पाठीवर आहेत. कृषी व्यवसाय हा उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्री आणि अत्यंत कमी भांडवलात करता येतो. त्यामुळे दारिद्रयरेषेखाली असलेल्या लोकांना सुध्दा तुटपुंज्या शेतीवर उदरनिर्वाह करता येतो. परंतू आता शेतीचे स्वरूप बदलले आहे. ती केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता व्यावसायिक महत्व सुध्दा अधोरेखीत करते. आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीचे स्वरूप पालटले आहे. अन्नधान्यासाठी शेती केली जाते हा समज मागे टाकून तंत्रज्ञानाच्या साहायाने शेतीचे व्यावसायीक स्वरूप विकसीत झाले आहे. तांदूळ, गहू, बाजरी, मका, हरभरा, तूर अशा अन्नधन्याच्या उत्पादनाशिवाय कापूस, ताग, रबर, ऊस अशी व्यापारी पिके ही मोठया प्रमाणात घेतली जावू लागली आहेत. भारतामध्येही 'हरित क्रांती' घडून आली आणि परंपरागत पध्दतीने होणारी भारतीय शेती कात टाकू लागली. भारतातील 70 टक्के लोकसंख्या कृषीवर अवलंबून आहे. भा...

शेती मधला बदल व सेंद्रिय शेती...... मिलिंद जि गोदे.

 नमस्कार मंडळी आज थोडं पण महत्वाचं विषय आहे शेती चां आमच्या कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती येथे दोन दिवसांचे सेंद्रिय शेती प्रशिक्षणाच्या माध्यमातून किटकशास्र विभागाचे श्री पाचकवडे सर यांनी विषय काढला रासायनिक शेतीचा व त्यामागील भयंकर परिणामाचा आज आपन नविन रोगाने भरडतोय आपला देश व पंजाब राज्याचं उदाहरण दीलं ते म्हणजे महाराष्ट्रातील कोल्हापूर चे व त्याच बरोबर एका युरोपियन शास्त्रज्ञाने जर्मनी चे रसायनशास्त्रज्ञ जस्टस लेबिग यांनी नत्र, स्फुरद आणि पालाश या शोध लावला.  व त्याच बरोबर जणु स्पर्धा च चालु झाली व सन 1905 मध्ये फ्रिट्‌झ हेबर या शास्त्रज्ञाने हवेतील नायट्रोजनपासून अमोनिया वायू तयार केला. 1915 मध्ये कार्ल बॉश या शास्त्रज्ञाने कृत्रिम अमोनिया तयार केला. त्याच अमोनियाने पहिल्या महायुद्धात कैसरच्या लढाईमध्ये सुमारे आठ लाख लोकांचा बळी घेतला. युद्ध संपल्यावर मग पिकाची वाढ करण्यासाठी तो शेतकऱ्यांना पुरवायला सुरवात झाली. नंतर पुन्हा आय. जी. फ्राबेन या कंपनीने दुसऱ्या महायुद्धात लोकांना मारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अमोनियाची निर्मिती केली. महायुद्धाच्या शेवटी या वायूची निर्मि...

वातावरण बदल एक वास्तविकता

  नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा आपल्या सेवेत थोडं पण महत्वाचं उन्हाळ्याच्या शेवटी प्रतिक्षा असते ती म्हणजे मृग नक्षत्रात येणाऱ्या पाऊसाची तो संततधार असावी नद्या-नाले, ओढे-तलाव भरभरून वाहावेत असे आपल्या वाटतं. आदर्श आणि उपयुक्त पावसाळा यापेक्षा वेगळा असू शकत नाही हे ही तितकेच खरे. परंतु आता काय झाले काय माहित मागील काही वर्षात मान्सूनचा संपुर्ण पॅटर्न बदलला आहे.तुम्ही जाणवले असेल. काही तज्ञ अपवाद आहे. मान्सून जरी जूनमध्ये दाखल झाला तरी, त्याची खरी सुरुवात जुलैमध्ये होते हे आपण याच वर्षात अनुभवलं आहे आणि ऑगस्टमध्येच तो खर्‍या अर्थाने सक्रिय होताना दिसतो आहे. सप्टेंबरच्या मध्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू व्हायला हवा. पण अनेकदा मान्सून नोव्हेंबपर्यंत सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. शिवाय पावसाचे भौगोलिक वितरण असमान आहे. दोन पावसांमधला खंडित कालावधी वाढला आहे. एकाच वेळी मुसळधार बरसल्यानंतर अनेक दिवस दडी मारून बसणारा पाऊस आता अनुभवायला मिळतोय. याचाच अर्थ पावसाचे प्रमाण आणि स्वरूप बदलत आहे, हे स्पष्ट होते. भारतातील शेती आजही बऱ्याच अंशी मान्सूनवर अवलंबून असल्याने साहजिकच त्य...

शेती मधे जागृक व्हा...! .. मिलिंद जी गोदे

 नमस्कार मित्रांनो आपला देश शेतीप्रधान आहे.आपली सर्वाची उपजीविका शेतीमधील अन्नधान्या वर अवलंबून आहे. शेती व शेतकरी यांचा विचार करूनच शासन नवीन योजना आखत असते. परंतु आपले काही शेतकरी तर शेतीला व्यवसाय म्हणून पाहतच नाही.आमच्या भागात तर‌ अशी परिस्थिती आहे की शेतकरी हा शेती करताना नाराज असतो.नेहमी कर्जाचा डोंगर असतोच. त्यामुळे बरेच शेतकरी येथे शेती सोडतात तर काही शेती करावी की सोडावी या द्विधा मनस्थितीत असतात आणि हीच बाब अतिशय चिंताजनक आहे व‌ विचार करण्याजोगे आहे मला असे वाटते की शेती जर नफ्याची करायची असेल तर आपल्या शेतकरी मित्रांनो नाविण्यपूर्ण उपाय करावे लागेल आपल्याला प्रथम शेती करण्याची आवड असली पाहिजे हा पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे.त्या नंतर शेतीचे काम करताना समाधान व आनंद असला पाहिजे.नाही तर नकारात्मक भूमिका घेऊन असे होत की आपल्या जवळ असलेली शेती च्या बाबतीत ‘लोक काय म्हणतील शेती केली नाही तर’ म्हणून कंटाळून व नाईलाज म्हणून फक्त शेती कडे पाहतात. काही तरुनाचे शेती बाबतीत नकारात्मक धोरण असते. शेती फायदेशीर नाही येणारा पाऊस वेळेवर पडत नाही व किडी व रोगामुळे पिकाचे नुकसान होते, ...

माती म्हातारी झाली का? का बरं...... मिलिंद जी गोदे

काही लोकांना वाटते की शेकाऱ्यना काहीच समजत नाही कोणी काही तर कोणी काही येऊन शेतकऱ्यांना सांगुन जाते आणि तो बिचारा बळीराजा पेचात पडतो. जेवढे डोक्यावर केस नाही तेवढ्या कुजवण्याच्या पद्धती आता दिसून येतात.शेती मधे जो येईल तो अक्कल वाटुन पसार होतो. शेतकर्याची परीस्थिती काही सुधरेना. दिवसेंदिवस शेतकरी हा पाचीला पुजल्या सारखा होत आहे याची कुठे तरी खंत वाटते. कुजलेलं खत म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी जन्माला घातल्या सारखें व्हय. मला तर कधीं कधीं तर वाईट वाटते की हे काय चालु आहे. ती इतकी ताकदवान आहे की निर्जिव असलेलं सर्वच कुजवते तरी आपण का तिला कुजवलेलं देतो. जर माती मधे जिवाणू आहेत मग शेतीत कुजवले ल आणून टाकण्याची काय गरज आहे?  बाहेर कुजवण्याला काय अर्थ आहे या वर आपण जरा सखोल विचार करण्याची गरज आहे. आपण शेतकरी मित्र पिकांवर वर तर लक्ष देतो पण माती वर नाही. जसे पिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या करतात तसे तर काही माती मध्ये करावे लागत . पण नियोजन बद्घ कामे आपल्याला माती सुपीकते कडे नेऊ शकते. माती मध्ये होईल तेवढे रासायनिक खताचे वापर टाळा जेणे करून तिचे आयुष्य वाढण्यास मदत होईल. माती परीक्षण ...

बिज गोळा

 नमस्कार मंडळी आजचा विषय आहे बि गोळा( सिड बाॅल ) आता तुम्हाला वाटलं असेल हे नवीन काय सांगत आहे मिलिंद गोदे.‍‍थोडा धिर धरा व वाचा मित्रांनो हे जुनी व आदर्श पद्धती आहे.आपले वडील जेव्हा शेतात कपाशी लावत होते त्या वेळेस त्या कपाशीच्या बियाण्यास माती लावत होते हे आपण पाहिले असेल व प्रयोग ही केला असेल त्यामुळे काय होते की माती लावल्या मुळे पक्षी किंवा उंदीर घुशी ते बि खात नाही दुसरं म्हणजे बि हे सुपिक व जिवाणू रहीत असल्यामुळें बियाण्याची उगवण चांगली होते व रोप ही चांगली रहाते ही सर्व आपल्या पुर्वंजाना ज्ञात होते म्हणजे एक प्रकारे ते तज्ञ च होते.पण कालांतराने ही पद्धत बंद झाली व आता शेतीच्या आधुनिकीकरणा मुळे त्याला वेगळं नांव दिले ते म्हणजे सिड बाॅल (माती गोळा) ते करायला वेळ व काळ हवा असतो तो म्हणजे पावसाळ्याला सुरुवात होण्याअगोदर माती मध्ये बी रुजवण्याची परंपरा आपल्याकडे अनादी काळापासून चालू आहे. पण त्यामध्ये माणसाची व शेतीपूरक अवजारांचा उपयोग मुख्यत्वे करून होत असे.पण जर निसर्गाचे संतुलन राखावयाचे असेल तर झाडांची लागवड व जोपासना करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी उन्हाळ्यामध्ये झाडाच्या खाली...
 नमस्कार मंडळी आजचा विषय आहे बि गोळा( सिड बाॅल ) आता तुम्हाला वाटलं असेल हे नवीन काय सांगत आहे मिलिंद गोदे.‍‍थोडा धिर धरा व वाचा मित्रांनो हे जुनी व आदर्श पद्धती आहे.आपले वडील जेव्हा शेतात कपाशी लावत होते त्या वेळेस त्या कपाशीच्या बियाण्यास माती लावत होते हे आपण पाहिले असेल व प्रयोग ही केला असेल त्यामुळे काय होते की माती लावल्या मुळे पक्षी किंवा उंदीर घुशी ते बि खात नाही दुसरं म्हणजे बि हे सुपिक व जिवाणू रहीत असल्यामुळें बियाण्याची उगवण चांगली होते व रोप ही चांगली रहाते ही सर्व आपल्या पुर्वंजाना ज्ञात होते म्हणजे एक प्रकारे ते तज्ञ च होते.पण कालांतराने ही पद्धत बंद झाली व आता शेतीच्या आधुनिकीकरणा मुळे त्याला वेगळं नांव दिले ते म्हणजे सिड बाॅल (माती गोळा) ते करायला वेळ व काळ हवा असतो तो म्हणजे पावसाळ्याला सुरुवात होण्याअगोदर माती मध्ये बी रुजवण्याची परंपरा आपल्याकडे अनादी काळापासून चालू आहे. पण त्यामध्ये माणसाची व शेतीपूरक अवजारांचा उपयोग मुख्यत्वे करून होत असे.पण जर निसर्गाचे संतुलन राखावयाचे असेल तर झाडांची लागवड व जोपासना करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी उन्हाळ्यामध्ये झाडाच्या खाली...

माती वाचवा व संवर्धन करा.....! मिलिंद जी गोदे

 नमस्कार मंडळी आज आपण त्या जिवन देण्यार्या मातीमायच्या उपकाराची जाणीव नाही आहे आपण दररोज तिच्यावर चालत असतो.तिच आरोग्य आणि तिची ओळख नष्ट करत आहे. परंतु आपल्याला तिची तेवढीच गरज असते जेवढी प्रत्येक क्षणाला श्वासाची.आता वेळ आली आहे ती म्हणजे आपण तिच्याविषयी बोलण्याची व आता ती वेळ म्हणजे की आपण तिचं रक्षण केलं पाहिजे कारण तिचं अस्तित्व आता धोक्यात आहे आणि आपलं अस्तित्व तिच्यावर अवलंबून आहे. ती आपलं पोषन आणि म्हणून तिचं रक्षण ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ती आपल्या माती चीओळख आहे.तिएक क्षणभर कल्पना करा की पृथ्वीवर सुपीक मातीच उरली नाही. तर मानवाच अस्तित्व राहील का?मग आपल्या रोजच्या ताटामधे जेवण नसेल हे सर्व सुपीक माती शिवाय असणं शक्यच नाही.उन्ह, वारा, पाऊस, प्राणी, वनस्पती यांद्वारे खडकाचे हळूहळू विघटन होऊन माती तयार होत असते. या प्रकारे १० सेंटीमीटर सुपीक माती तयार होण्यासाठी जवळपास २००० वर्षे एवढा दीर्घ कालावधी लागतो. विचार करा, फक्त दहा सेंटीमीटरसाठी दोन हजार वर्ष लागतात! त्या मातीची आपण काळजी न घेतल्याने अगदी काही वर्षात तिला नष्ट करतो ते ही नेहमीसाठी. वने आणि वनस्पती या मातीचं ...