शेती विषयक माहिती
नमस्कार मंडळी गांडूळ हा शेतकरी मित्र आहे त्या पासुन जैविक सुपीकता कशी होते हे पाहू गांडूळाच्या विष्ठेतील ''बॅक्टैरिया'' या जिवाणूंचे प्रमाण जमिनीतील जिवाणूंच्या संख्येच्या तुलनेने १३ पट अधिक होते, असे पानोमरेव्हा या शास्त्रज्ञास १९६२ साली आढळून आले आहे. जमिनीत हे जंतू ५.४ दशलक्ष प्रती ग्रॅम इतके होते, याशिवाय फंगस व ऍक्टिनोमायसीटस् काही प्रमाणात तर ऍझोटोबॅक्अर हे नत्र स्थिर करणारे जिवाणू ब-याच मोठया संख्येने गांडूळ विष्ठेत आढळून आले. सेंद्रीय पदार्थाचे जिवाणूंच्या सहाय्याने विघटन कार्य विष्टा बाहेर टाकल्यानंतरही बरेच दिवस ब-याच वेगाने चालू असते. त्यांची विष्टा त्यातील जिवाणूंचे आजूबाजूच्या जमिनीवर प्रसार करण्याचे केंद्र बनते. गांडूळाच्या विष्टेत असलेले ''नेकार्डिया, ऑक्टिनोमायसिट्स व स्टेप्टोमायसेस'' सारखे जिवाणू अँटीबायोटिकस्स सारखे परिणामकारक असतात. अशाप्रकारे गांडूळाची आतडी सुमारे एक हजार पटीपेखा अधिक संख्येने जिवाणूंची संख्या वाढवून एक प्रकारे नैसर्गिक रिऍक्टरचे (Bio-reactor) काम करतात. तर विष्टेद्वारा बाहेर पडलेले सुक्ष्म जिवाणू जमिनीची जैविक स...