पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
*शेती ला तंत्रज्ञानाची जोड हवी!*....*मिलिंद जि गोदे* नमस्कार मंडळी आपन सर्व शेतकरीच आहे .पण काही गोष्टी आपन अजुन अवगत केल्या नाहीत ते म्हणजे शेती मधे तंत्रज्ञान त्याच बरोबर शेती कसण्याच्या नवीन पद्धती, आपलं बियाणं व पिकांमधे मध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत.नविननविन वान बाजारात येत आहे त्याच बरोबर इतर क्षेत्राप्रमाणे शेती मधे यांत्रिकीकरणाचाही वापर होणे गरजेचे आहे.आपण केलेली शेती कसण्यासाठी मेहनत व त्याच बरोबर नवीन तंत्रज्ञानाची जोड या गोष्टीचा समन्वय साधून अधिक उत्पादन घेण्यासाठी आपला शेतकरी वर्ग नेहमी प्रयत्नशील असला पाहिजे. शेती हा व्यवसाय करताना त्या गोष्टीच व्यवस्थापन करणे महत्त्वाचेआहे.त्याच बरोबर ढोरं मेहणत करून शेती कसणे म्हणजे शेतिमधुन पिक काढणे नाही तर त्या मेहनतीला शेती मधे योग्य नियोजन व शास्त्र शुद्ध व्यवस्थापनाची दिशा असावं लागतं! शेती मधे जे कमीआहे त्या गोष्टी ची देखभाल करणं नियोजनाची आवश्यकता असते. त्याच बरोबर आपल्या शेती मधे पाण्याचा काटेकोरपणे वापर करून जास्त उत्पादन घेणं महत्त्वाचं आहे व कमी खर्चात पिकावरील रोग नियंत्रण करणं योग्य खत व्यवस्थापन व पीक व्यवस्थापन या स...

पिकं संरक्षण

*पिकाचे निरीक्षण व नियोजन करणे महत्त्वाचं!* नमस्कार मंडळी आपन शेतामध्ये पीकावर फवारणी करतो पण आपण कधी कधी विचार न करुन फवारणी करतो.शेती या क्षेत्रात अनेक गोष्टींचा विचार करूनच कोणते काम केले पाहिजे मग ती फवारणी असो की खत व्यवस्थापन असो आपन तसे पाहिले तर फवारणी ही शेवटच्या टप्प्यातल्या प्रश्न आहे सांगायचे झाले तर पिकांवर जर भरपूर प्रमाणात कीटक असेल तर या गोष्टीचा वापर योग्य आहे.म्हणजे जर एखादा प्रश्न आपल्याला साध्या मार्गाने सोडवता येत असेल तर आपण तो प्रश्न साध्या सोप्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करायला पाहिजे. काही शेतकरी पिकावर फुले येण्या अगोदरच फवारणी करतात.पण कोणकोणते पीक असे असतात कि त्याला वेळेवर उपचार किंवा फवारणी करावा लागते. आपन शेती मधे फवारणी करतो त्या मागे वेगवेगळी कारणे असतात.परंतु कारण जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजेच पिकावर काही कीड पहिल्यांदा पडतात त्याचे निवारण शक्यतो नैसर्गिक पद्धतीनेच करायला पाहिजे. मात्र आपण तसे करत नाही आपण सूरवात इतकी खतरनाक करतो की सुरुवातीलाच घातक विषारी रसायनांची फवारणी करून सर्व कीटक मारून टाकतो त्यामध्ये काय होते कि शत्रू किटकासोबत मित्र कि...