*शेती ला तंत्रज्ञानाची जोड हवी!*....*मिलिंद जि गोदे*
नमस्कार मंडळी आपन सर्व शेतकरीच आहे .पण काही गोष्टी आपन अजुन अवगत केल्या नाहीत ते म्हणजे शेती मधे तंत्रज्ञान त्याच बरोबर शेती कसण्याच्या नवीन पद्धती, आपलं बियाणं व पिकांमधे मध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत.नविननविन वान बाजारात येत आहे त्याच बरोबर इतर क्षेत्राप्रमाणे शेती मधे यांत्रिकीकरणाचाही वापर होणे गरजेचे आहे.आपण केलेली शेती कसण्यासाठी मेहनत व त्याच बरोबर नवीन तंत्रज्ञानाची जोड या गोष्टीचा समन्वय साधून अधिक उत्पादन घेण्यासाठी आपला शेतकरी वर्ग नेहमी प्रयत्नशील असला पाहिजे. शेती हा व्यवसाय करताना त्या गोष्टीच व्यवस्थापन करणे महत्त्वाचेआहे.त्याच बरोबर ढोरं मेहणत करून शेती कसणे म्हणजे शेतिमधुन पिक काढणे नाही तर त्या मेहनतीला शेती मधे योग्य नियोजन व शास्त्र शुद्ध व्यवस्थापनाची दिशा असावं लागतं! शेती मधे जे कमीआहे त्या गोष्टी ची देखभाल करणं नियोजनाची आवश्यकता असते. त्याच बरोबर आपल्या शेती मधे पाण्याचा काटेकोरपणे वापर करून जास्त उत्पादन घेणं महत्त्वाचं आहे व कमी खर्चात पिकावरील रोग नियंत्रण करणं योग्य खत व्यवस्थापन व पीक व्यवस्थापन या सर्व गोष्टी शेती व्यवसायासाठी लाभदायी ठरणार आहे. कुठलेही पीक उत्पादन घेत असतांनाच नवीन तंत्र विकसित करण्याची गरज आहे. त्याच बरोबर आपल्या हवामानातील बदल याबाबत माहिती आवश्यक आहे.कीड,रोग,तण या बाबतीत आपल्याला अपुरे ज्ञान इत्यादी घटकांमुळे शेती व्यवसायामध्ये पाहीजे तसे उत्पादन मिळत नाही.आपन खरिफ पीक लागवडीनंतर हंगामाच्या शेवटी आपल्या पिक उत्पादनाचा अंदाज ही शेतकऱीवर्गाला नसतो. आपन पिकाला पाहून अंदाज लावतो पण तो खरा ठरत नाही. या बाबतीत एका गोष्टीचा मि अभ्यास केला की आपल्या शेती मधल्या पिकांच उत्पादन प्रत्येक हंगामास बदलत असते.त्या बरोबर आकस्मिक होणारा हवामान बदल जसे ओला कोरडा दुष्काळ केव्हा तर पूर परिस्थितींमुळे संपूर्ण शेती चे पीक उद्ध्वस्त होते. याशिवाय पिक वर जंगलीप्राणी इत्यादी जीव आपल्या पीक उत्पादनांवर परिणाम करतात व नुकसानीस कारणीभूत असतात.आपल्या जर शेती क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर शेती उत्पादनातील योग्य नियोजन व योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते.... धन्यवाद
*Save the soil all together*
*मिलिंद जि गोदे*
*Mission agriculture soil information*
*9423361185*
पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....
*पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा