नत्र चक्र निसर्ग हा जिवाणुच्या मदतीने चालवतो....... मिलिंद जि गोदे
*निसर्ग हा जिवाणुच्या मदतीने चालवतो नत्राचे चक्र....... मिलिंद जि गोदे* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे आज थोडा वेगळा विषय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या निसर्गात आढळणारी एक अद्भूत गोष्ट अशी की हवेत नत्राचे प्रमाण ७९ टक्के असूनही तो आपल्या पिकांना प्रत्यक्ष उपलब्ध होऊ शकत नाही. त्यासाठी वनस्पतीला सूक्ष्म जिवाणूंची मदत घ्यावी लागते. पिकांना नत्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंना नत्र स्थिर करणारे जिवाणू म्हणून संबोधितात. हे जिवाणू नायट्रोजनेज नावाच्या संप्रेरकाची निर्मिती करून वायू रुपातील नत्राचे अमोनिया स्वरुपात रूपांतर करून तो पिकांना उपलब्ध करून देतात.मातीत वास्तव्य करणारे रायझोबियम व ब्रेडीरायझोबियम समूहातील नत्र स्थिर करणारे सूक्ष्म जिवाणू द्विदलवर्गीय पिकांच्या मुळांत प्रवेश गाठी निर्माण करतात. या गाठींमध्ये रायझोबियम जिवाणू सुरक्षित राहून वनस्पतीकडून अन्नरस शोषून घेतात व त्या बदल्यात नायट्रोजनेज विकराच्या सहाय्याने हवेतील मुक्त नत्र गाठीत स्थिर करतात. त्याचा पिकांना उपयोग होतो. द्विदल पिकांच्या गाठीचे अवशेष जेव्हा जमिनीत कुजतात तेव्हा...