शेती मध्ये तंत्रज्ञान गरजेचे आहे ............ मिलिंद जि गोदे...

 *शेती नविन पद्धतीने केले तर फायद्याची..... मिलिंद जि गोदे*

नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत वाचाल तर वाचालआजकाल शेतकरी वर्ग पिकावरील बुरशीने अतिशय त्रस्त आहे.सतत चांगली औषधे फवारणी करुन सुध्दा पिकावरील बुरशी व रोग नियंत्रणात येत नाही.पांढरी माशी, थ्रिप्स, कोळी किंवा कोणत्याही किटकांचे वाढणे हे दर्शवते कि त्यांचे पोषण करणारा रस झाडांमध्ये उपलब्ध आहे.

जोपर्यंत ते आहे तोपर्यंत चांगली औषधे पण त्याचे काही बिघडू शकत नाही.माती मधे आपन विषारी रसायनाची फवारणी केली व आपन माती मधल्या मित्र बुरशी चा नायनाट केला. परीणाम आपल्या समोरच आहे.की हरभरा वरील अकस्मात मर हे मानवनिर्मित क्रिया होय.आता थोडं विषयावर येऊ.आता प्रश्न हा आहे की झाडाच्या आतील रसाला कमी कसे करायचे खूप सोपे आहे नायट्रोजन वाढला तर रस वाढेल आणि कार्बन वाढला तर गर वाढेलच जर आपन त्या आधी जिवामृताचा वापर केला तर त्यामुळे कार्बन वाढेल आणि त्यामुळे मातीचा व इतर क्रॉप, फ्रुट, फ्लॉवर वर साइज जिवामृत मुळे झाडांमधील कार्बन चा रेशो वाढेल आणि झाडांमध्ये रस राहणार नाही तर रस शोषणारी अळी थांबणार नाही आणि जरी आली तरी ती निंबोळीअर्क किंवा तेल सारखी स्वस्त औषधांपासून कंट्रोल मध्ये येईल.शेतकरी बांधव काळजी पूर्वक वाचा आणि आवश्यक बदल करा, पेस्टिसाइड स्प्रे करणे हे तात्पुरते सोलुशन आहे.त्याला कायमस्वरूपी केले तर नुकसान होईल. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजण्याच्या पलीकडे आहेकारण त्यांच्या मान्यतेला धक्का लागतो, जीवनभर जो मान्यतापूर्वक शेती करत आहे ते तर एका क्षणात खोटे ठरत आहे.

पण ते स्वतः अनुभव घेतील कि ते किती मोठी चूक करत आहे आपल्या हातने स्वतः चे नुकसान करून घेत आहे हे लक्षात येईल.

 कमीतकमी २/३महिने सतत जिवाअमृत वापर केल्याने चमत्कार पाहायला मिळेल आणि एकदा कि रिझल्ट मिळायला सुरुवात झाली तर तुम्ही बंद जरी केले तरी दुसऱ्या वर्षी रिझल्ट पाहायला मिळतो. कारण हे माती आणि झाडांना चार्ज करण्याचे तंत्र आहे.संशोधन करणारी शास्त्रज्ञचे असे मत आहे कि २/३वर्ष १००% वापर केल्याने आपली माती पुन्हा ३० वर्षांपूर्वी सारखी सुपीक होईल.झाडे कमकुवत नाही राहणार त्यामुळे कोणत्याच रोग नाही येणार आणि आला तरी दूर होईल !आणि बाजारातील उत्पादनाच्या झाडांना उत्तेजन देऊन त्याच्याकडून कुत्रिम वाढ करून घेतात ज्यामुळे झाडे, फुले, फळे वाढताना दिसतात पण वातावरण्यात थोडासा बदल झाला तरी रोगाला बळी पडतात.हा नियम विल्ट ,निमॅटोड, फ्रुट शार्ट होल बोरर इत्यादी सगळ्या प्रॉब्लेमला लागू होतात.

 एक उदाहरण देतो शेतकऱ्यांना माहित आहे की फळ तयार होण्याच्या वेळेस पतंग म्हणजेज ज्या फळांना पंक्चर करणारे फुलपाखरे होतात, त्यांना नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही मार्ग नाही.खूप सोपी गोष्ट आहे पतंग हा रस शोधत असतो आणि जिवमृत मुळे गर वाढतो त्यामुळे पतंग अटैक करत नाही.झाडांना कार्बन चे पोषण देणे फक्त उत्पादन नाही वाढवत त्याच्या आतील ताकतीला पोषण देते. खूप लोक औषध समझतात पण हे एक नैसर्गिक पोषणाचे विज्ञान आहे.म्हणूनच जिवाअमृत फक्त उत्पादन वाढविणारे नाही तर सॉईल, झाड व शेतकरी या सगळ्यांनाच बनविण्याचं एक तंत्रज्ञान आहे.

याला समजून घ्या आणि वापरा कमीत कमी पूर्ण सीजन मध्ये एक दोनदा वापरून पहा.

जे कोणी याला १००% वापरलं तर शेतकरी याला कधीच सोडूशकनार नाही हे तेवढं सत्य आहे......

शिका व शिकवा

वाचाल तर वाचाल


मिलिंद जि गोदे

युवा शेतकरी व सेंद्रिय शेती अभ्यासक

Agriculture development and technology

Group 

milindgode111@gmail.com

Save the soil all together

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....

सहज व शक्य शेती...... मिलिंद जि गोदे