पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं *जीवाणु हा शेतीचा आत्मा आहे"*... हे विधान गोंधळ निर्माण करणारे आहे आणि त्या गोंधळामुळेच लाखो शेतकरी जैविक शेतीच्या नावाखाली ढोर मेहनत करत आहेत. लगेच मत बनवु नका व तुमच्या मताना छेद गेला म्हणून न चिडता हा पूर्ण लेख वाचा मग जरूर आपला प्रतिसाद नोंदवा. शेतीचा आत्मा सेंद्रिय कर्ब आहे हे मी 2016 च्या एग्रोवन वर्तमान पत्रात वाचले तेव्हापासून त्याचा खोलवर अभ्यास करतोय. जीवाणु तेव्हाच उत्पन्न होतात व वाढतात जेव्हा त्यांना अन्न असते आणि अन्न आहे आर्गेनिक कार्बन किंवा ह्यूमस !! आता हेच पहा ना ... तुम्हाला मुंग्या गोळा करायच्या असतील तर तुम्ही काय कराल ? त्यांना शोधत बसाल की साखर टाकाल अगदी त्याप्रमाणे जीवानुंचे अन्न वाढवा जमिनीत ते आपोआप येतील आजपर्यंत जे जीवाणु स्लरीचा प्रचार प्रसार करत आहे. त्यांनी याचा अभ्यास करायला हवा की आपल्या पूर्वजांनी कुठे असला उल्लेख केलेला आहे की एखाद्या शास्त्रज्ञांनी याचे संशोधन केलेले आहे! लक्षात घ्या... शेतकरी टेंशन मुक्त झाले तरच त्यांचा आत्मविश्वास वाढेल व योग्य अयोग्य समजून घेण्याची क्षमता वाढेल. अर्थात विचार सरणी! ...

Milind gode

नमस्कार मंडळी आपल्या शेत जमिनीचे आरोग्य जर उत्तम असेल तर त्यातील जीवाणू आणि पिकांचे आरोग्य उत्तम राहते त्याच बरोबर माणसाचेही आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे आपल्या जमिनीच्या आरोग्यास महत्त्व देणे ही काळाची गरज आहे. राज्यातील विभागानुसार प्रत्येक हंगामात विविध पिके घेण्यात येतात. त्यामध्ये तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, भाजीपाला पिके, फूल पिके, फळपिके यांचा समावेश होतो. पिकांची पेरणी करताना ज्या पिकास आपल्याला हमखास आणि चांगला बाजारभाव मिळेल याचा विचार प्रथम करून पिकांची पेरणी करताना सर्व प्रक्रिया मध्ये पिकांचा फेरपालट या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या पिकांना चांगला बाजारभाव मिळतो.आता आपले चुकतेय कोठे! आपन शेती मध्ये तेच ते पिके एकाच क्षेत्रातून घेतो त्यामुळे जमिनीचा कस हमखास कमी होऊन तिची उत्पादनक्षमता कमी झाली की पिकांचे उत्पादन कमी मिळते. त्याचबरोबर पिकांवर काही रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढतो व पीक त्यास हमखास बळी पडते. पर्यायाने कमी उत्पादन पदरात पडते. यासाठी पिकांची फेरपालट करणे अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाच आहे. त्याचप्रमाणे जादा उत्पादन मिळवण्यासाठी जमीन मुळात उत...