माती म्हातारी झाली का? का बरं...... मिलिंद जी गोदे

काही लोकांना वाटते की शेकाऱ्यना काहीच समजत नाही कोणी काही तर कोणी काही येऊन शेतकऱ्यांना सांगुन जाते आणि तो बिचारा बळीराजा पेचात पडतो. जेवढे डोक्यावर केस नाही तेवढ्या कुजवण्याच्या पद्धती आता दिसून येतात.शेती मधे जो येईल तो अक्कल वाटुन पसार होतो. शेतकर्याची परीस्थिती काही सुधरेना. दिवसेंदिवस शेतकरी हा पाचीला पुजल्या सारखा होत आहे याची कुठे तरी खंत वाटते.

कुजलेलं खत म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी जन्माला घातल्या सारखें व्हय. मला तर कधीं कधीं तर वाईट वाटते की हे काय चालु आहे. ती इतकी ताकदवान आहे की निर्जिव असलेलं सर्वच कुजवते तरी आपण का तिला कुजवलेलं देतो. जर माती मधे जिवाणू आहेत मग शेतीत कुजवले ल आणून टाकण्याची काय गरज आहे?  बाहेर कुजवण्याला काय अर्थ आहे या वर आपण जरा सखोल विचार करण्याची गरज आहे.

आपण शेतकरी मित्र पिकांवर वर तर लक्ष देतो पण माती वर नाही. जसे पिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या करतात तसे तर काही माती मध्ये करावे लागत . पण नियोजन बद्घ कामे आपल्याला माती सुपीकते कडे नेऊ शकते. माती मध्ये होईल तेवढे रासायनिक खताचे वापर टाळा जेणे करून तिचे आयुष्य वाढण्यास मदत होईल. माती परीक्षण करून आपण जमिनीच्या सुपीकतेचा सखोल अभ्यास करून नियोजन करू शकतो. माती मध्ये कुजलेले खत टाकण्या पेक्षा न कुजलेले टाकल्यास कधीही योग्य राहील कारण माती मधल्या जिवाणू चे कार्य वाढते व ते नेहमी सक्रिय राहतात व माती भुसभुीत ठेवण्या साठी उपयोगात येतात. माती ही असंख्य  मल द्रव्यांचे माहेर घर आहे तिला जतन करणे काळाची गरज आहे..

विचारांची दिशा बदला जिवणाची दशा आपोआप बदलेल......

Milind j gode 

Save the soil

9423361185

milindgode111@gmail.com


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....

सहज व शक्य शेती...... मिलिंद जि गोदे