*नमस्कार मित्रांनो सेंद्रीय कार्बन म्हणजे काय ?* सेंद्रीय कर्ब म्हणजे पिकांच्या
पानांनी म्हणजे पिकांच्या पानरूपी इंद्रीयांनी प्रकाश संश्लेषणच्या मध्यमातुन
हवेतुन घेतलेले कार्बन होय. *सेंद्रीय कर्बाचे प्रकार पाहू* 1) उडनशील कर्ब
वोलाटार्इल कार्बन 2) अस्थिर कर्ब अनस्टेबल कार्बन 3) स्थीर कर्ब स्टेबल कार्बन *1)
उडनशील कर्ब वोलाटार्इल कार्बन* कोणतेही अंतरपिक फुलोरयावर येणाच्या आधी कापून
आच्छादन करतो ते आच्छादन कुजून जो कर्ब मोकळा होतो त्या कार्बनला पळपुट्टया कार्बन
म्हणतात. हा कार्बन ह्युमस मध्ये कधीच जमा होत नाही व हवेत निघून जातो व वातावरणाचा
तापमान वाढवतो. त्यामुळे फुलोऱ्याच्या काळात आच्छादन करू नये. 2) अस्थिर कर्ब
अनस्टेबल कार्बन कोणताही अंतरपिक फुलावर आल्यानंतर ते कापून आच्छादन केले तर
त्यामध्ये अस्थिर कर्ब असतो. तो कधीच ह्युमस मध्ये जमा होत नाही पण हा कर्ब ताबडतोब
मुक्त होत नाही काही वेळांनी मुक्त होतो व हवेत निघून जातो म्हणुन हा अस्थिर कर्ब
आपल्या कामाचे नाही म्हणुन कोणतेही अंतरपिक फुलोरयावर कापू नये. 3) स्थीर कर्ब
स्टेबल कार्बन हा स्थिर कर्बच फक्त ह्युमस मध्ये जमा होतो. ह्याच्यामुळे ह्युमस ची
निर्मिती होते जेव्हा अंतरपिकांचे दाने पक्व होण्याच्या स्थीतीत असतात त्यावेळेस
कर्बाची निर्मीती होते. आणी हा स्थीर कर्ब लीगनीन(काष्ठजन्य पदार्थ) व सेल्युलोज
(काष्ठक जन्य पदार्थ) ह्याच्यामध्ये संग्रहीत होते. म्हणुन ह्युमस निर्माण
करण्यासाठी दाणे पक्व झाल्यानंतर आच्छादन दिले पाहिजे. सेंद्रिय कर्बाचे महत्त्व :
आजच्या परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे जमिनीचा
कस कमी होणे, जमिनीची धूप अधिक होणे, जमिनीची सुपीकता कमी होऊन जमिनीच्या भौतिक,
रासायनिक आणि जैविक गुणवत्तेत प्रतिकूल बदलासारखे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. या
सर्व प्रश्नावर उपाय म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा समतोल राखणे फार महत्त्वाचे
आहे. माती परीक्षण अहवालाचा केलेल्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे, शेतीमध्ये
सेंद्रिय द्रव्यांचा वापर कमी प्रमाणात आहे म्हणून आजच्या परिस्थितीत जमिनीतील
सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यल्प आहे (0.2 ते 0.5 टक्का) त्यामुळे जमिनीचा कस कमी
होणे, जमिनीची धूप अधिक होणे, जमिनीची सुपीकता कमी होऊन जमिनीच्या भौतिक, रासायनिक
आणि जैविक गुणवत्तेत प्रतिकूल बदलासारखे अनेक प्रश्न आहेत. जमिनीच्या या सर्व
प्रश्नावर उपाय म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा समतोल राखला जाणे फार महत्त्वाचे
आहे.
पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....
*पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा