शेती मधे नविन मार्ग तयार करा.... मिलिंद जि गोदे

 नमस्कार मंडळी मी मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत माझ्या हा लेख वाचाल यांची मला पुर्णतः खात्री आहे. आपली शेती पुर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. आपल्या शेतकऱ्यांचे काही आर्थिक व्यवहार आपल्या शेतीतुन निघणार्या पिकावर अवलंबून असतात.आपला शेतकरी वर्ग आपआपल्या भागात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात. काही पिके भौगोलिक क्षेत्रानुसार चांगल्या प्रकारची उत्पन्न देणारी असतात तर काही पिके कमी प्रमाणात उत्पन्न देणारी असते. आणि आपला शेतकरी वर्गाला काही पिकांना खर्च जास्त करावा लागतो तर काहीना पिकांना कमी करावं लागतं. कधी कधी शेती मधे केलेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात खुप तफावत आढळत असल्याने शेतकऱ्यांचीआर्थिक समस्या वाढत जाते. म्हणून प्रत्येक प्रगतशील शेतकऱ्याने दूरदृष्टीचा अवलंब केला पाहिजे. केलेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात तफावत का येते याची माहिती समजाऊन घेतली पाहिजे व आपला शेती वर लागणारा अनावश्यक खर्च टाळणे देखील यात तेवढेच महत्वाचे आहे.आपल्याला माहिती असेल काही वेळेस शेतकऱ्यांच्या होणार्या आत्महत्येमागे केवळ कर्ज आहे म्हणून आत्महत्या केली हेच कारण नसते तर त्यामागे कौटुंबिक वाद, सामाजातील घडामोडी ,अंतर्मनातील दोष यासारखे अनेक कारणे असतात. काही शेतकरी पैशा नसल्यामुळे हतबल होतो तेव्हा तो बँकेचा आधार घेऊन कर्ज काढतो. ते ही आपल्या मनासारखं होत नाही ते जर कर्ज वाढत वाढत जातं शेती मधुन निघणार उत्पादन कमी होत जाते कारण बँकेचे कर्ज व त्यावरच व्याज त्याला भरावे लागते.अशा काही गोष्टीमुळे काही शेतकरी वर्ग आपल्या मित्रपरिवार व जवळीक नातलग यांच्याकडून आर्थिक मदत घेण्याचा प्रयत्न करत असतो. काही शेतकरी तर सोने गहाण ठेवून कर्ज घेतात. अशा अवस्थेत शेतकऱ्यांची पैशाची अडचण काही दिवसांसाठी का होईना काही प्रमाणात कमी होते. मात्र अशा सततच्या आर्थिक समस्येमुळे शेतकऱ्यांच्या घरातील वातावरण आणि सामाजिक आंतरक्रिया हळूहळू नकारात्मक होतं जातात. मित्रानी किंवा नातेवाइकानी मागितलेली उधारी शेतकऱ्याला जड जाते. कारण त्यावेळेस त्यांच्या समोर एकत्रित रित्या कर्जाचा खूप मोठा डोंगर उभा राहिलेला असतो. त्यामुळे त्याची चिडचिड होते. परिणामी घरात कलह सुरु होतो. वाढणारे कर्ज आणि मिळणारे उत्पन्न यात तफावत वाढत गेली तर घरातील कलह देखील वाढत जाते आणि त्याची मानसिकरीत्या तो मनाने तुटून जातो. परिणामी अशाच कलहातून त्यांच्या मनात आत्महत्येची वृत्ती निर्माण होते. 

पण आज नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्यामुळे शेतीचा विकास झपाट्याने वाढत आहे. आपले एकरी उत्पन्नाचे प्रमाण वाढत आहे. मात्र शेतीकडे शेतकऱ्यांचा दृष्टीकोन काहीसा नकारात्मक स्वरूपाचा होत जात आहे. आपण दुर्बल आहेत, शोषित आहे असे आपल्याला वाटते. काही शेतकऱ्यांच्या कुटुंबात आपल्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे, त्याने पुढे जाऊन शेती करू नये असा दृष्टीकोन असतो. पर्यायाने शेतकरी पैसे खर्च करून आपल्या मुलाला शिकवितात. आजच्या युगात नोकरी मिळविणे कठीण आहे हे आपल्याला माहितच आहे. शेतात काम केले तर समाज नाव ठेवतो, नाही केले तर घरचे नाव ठेवतात. घरची सर्व व्यक्ती आपला मुलगा नोकरीला लागेल या आशेवर असतात. म्हणून अशा मुलांची मानसिकता नकारात्मक स्वरुपाची होत जाते.तसेच शेतकऱ्यांना आपल्याच मालाचा भाव देखील करता येत नाही. व्यापारी जे भाव सांगेल तो त्याप्रमाणे द्यायला तयार होतो. म्हणून अपेक्षित उत्पन्न आणि प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न यात फरक दिसून येतो. शेतकऱ्यांना हि बाब माहित नाही असे नाही. त्यानाही माहित आहे. पण स्वताला दुर्बल समजल्यामुळे तो यात पडत नाही.शेतकऱ्यांच्या नकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यामागे वेगवेगळी समाज माध्यमे देखील जबाबदार असतात. ज्या वेळेस शेतकऱ्यांचा शेतीमाल तेजीत असेल तर सर्वसामन्यांना परवडणार नाही असे दाखविले जाते किंवा पटवून दिले जाते. त्यामुळे वेगवेगळी धोरणे आखून तेजीत असलेला भाव सामान्य स्वरुपात आणला जातो. पण तोच भाव मातीमोल स्वरुपात असेल तर त्याचा विचार कोणीही करत नाही आणि तो भाव सामान्य स्वरुपात आणला जात नाही.ज्यांचा या शेतीशी कोणताही संबंध नाही असे काही लोक शेतीविषयक शिक्षण घेताना शेतीविषयक माहिती घेतात. अशा व्यक्ती शेती तज्ञ म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्याबदल्यात फी पण घेतात. आणि उत्कृष्ट असा मार्गदर्शन करण्याचा व्यवसाय सुरु करतात. जर शेतकऱ्यांची मुले जर या क्षेत्रात जर गेली तर त्यांना शिकण्याची गरज नाही. शिक्षण घेताना असलेल्या ज्ञानात शास्रीय भर पडेल, हाच फरक येथे सांगता येईल.खरे सांगायचे झाल्यास काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत प्रचंड सुधारणा केली आहेत. अल्पभूधारक शेती असून सुद्धा बरेच शेतकरी योग्य नियोजन करून चांगल्या स्वरुपात उत्पन्न घेताना दिसून येतात. त्यांच्यामध्ये असणारा फरक मेहनतीचा नक्कीच आहेत, त्याबद्दल शंका नाही; पण त्याच बरोबर त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोणाचाही आहे, हे सुद्धा आपल्याला मान्य करावाच लागेल...... धन्यवाद

*विचारांची दिशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेलं*

*शेती बलवान तर पिक पहिलवान*

*मिलिंद जि गोदे*


*माती परीक्षण*


*कृषी विकास व तंत्रज्ञान समुह*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....

सहज व शक्य शेती...... मिलिंद जि गोदे