[4/23, 10:17 PM] मिलिंद जि गोदे: नमस्कार मित्रांनो आपली भारतीय संस्कृती महान आहे मानवतेच्या दृष्टीने असो की पर्यावरणाच्या!आपन निसर्ग पुजक त्याच बरोबर निसर्गाने दिलेल्या सूचनांचे पालन करतो आपल्या संस्कृतीत कडूिंलबाचे फार मोठे योगदान आहे. महत्वाचं म्हणजे कडूिंलबाचे झाड सतत प्राणवायू वातावरणात सोडत असते.त्याचप्रमाणे मानवाच्या दृष्टीने वातावरणातील घातक असा कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेत असतो.आपले पुर्वज रात्री झाडा खाली कधीच झोपत नसतं त्या मागिल हेच कारण असु शकते. त्या मधे फायद्याची बाब म्हणजे या वृक्षामुळे धूळ व धूर दोन्हीही अडविले जातात. हे एकमेव झाड आहे कि निसर्ग चक्राच्या विपरीत चालते हीवाळ्यात पाणाची गळून पडतात व उन्हाळ्यात सदैव हिरवेगार राहात असल्यामुळे आपणास नियमित घनदाट व शीतल अशी सावली मिळत असते.बहुउपयोगी असे हे झाड असल्यामुळे कृषिक्षेत्रात या झाडाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. निंबोळी किंवा पानांचा अर्क तसेच निंबोळी तेल हे सर्वोत्कृष्ट असे नैसर्गिक कीड, रोग व जिवाणुनियंत्रक आहे. निंबोळी अर्क अर्थात निमार्क किंवा निंबोळी तेलाने अनेक प्रकारचे कीड व रोग नियंत्रित होतात. यामुळे एकंदरीत पिकांच्या गुणवत्तेत व उत्पादनात वाढ होऊन मातीचा पोत अबाधित राखण्यास मदत होते.
संपूर्ण जगभर तसेच भारतात या बहुउपयोगी झाडाचा व त्यामधील घटकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच निंबोळी व तेलाचा सूत्रकृमी नियंत्रक म्हणूनदेखील उपयोग करता येतो. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी हे एक वरदान आहे. याशिवाय निंबोळ्या व पाल्याचे खतदेखील अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. कडूनिंब वृक्षाच्या पानांमध्ये व बियांमध्ये खालीलप्रमाणे रासायनिक घटक आढळून येतात.
ॲझेडिक्रेटीन : हा घटक साधारणतः 90 टक्के परिणामकारक असून हा घटक किडींना जवळ न येऊ देता त्यांचेमध्ये अपंगत्व आणून त्यांना संपुष्टात आणण्यासाठी क्रियाशील असतो. 1 ग्रॅम बियांमध्ये साधारणतः 2 ते 4 मि.ली. ग्रॅमएवढे प्रमाण आढळते. हा घटक पिकांवर किड्यांचा प्रादुर्भाव होऊ देत नाही. किडींचा जीवनक्रम संपविण्यासाठी हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो.
निम्बीसीडीन/ निंम्बीन व निम्बीडिन : विषाणूविरुद्ध क्रिया करण्यासाठी हा घटक उपयुक्त असल्याकारणाने या घटकालासुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. पिकांवरील तसेच जनावरांच्या विषाणू रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या घटकांचा उपयोग होतो.
नेलीयानट्रिओल : या घटकांचा उपयोग झाडांची व रोपांची पाने खाऊ न देण्यासाठी होतो. या घटकांचा चांगला उपयोग होऊ शकतो.
सालान्नीन : हा घटक पिकांवरील पाने खाणार्या किडींवर प्रभाविपणे कार्य करतो. तसेच घरातील माश्या, भुंगे, खवले यावरसुद्धा प्रभावीपणे कार्य करतो.
डिॲसीटील ॲझेडिक्रेटीन : हासुद्धा महत्त्वाचा घटक असून याचे कार्यसुद्धा किडींना प्रभावीपणे दूर ठेवण्यासाठी उपयोगात आणले जाते. एकंदरीत कडूिंलबाच्या पानांपेक्षा बियांमध्ये जैविक क्रिया करणारा घटक अधिक तीव्र आहे.
नियंत्रित होणारे कीटक : मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, ठिपक्याची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, हिरवी बोंडअळी, मुंगी प्रजाती, भुंगा प्रजाती, पाने गुंडाळणारी अळी, उंटअळी, तांबडी केसाळ अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, हिरवे ढेकूण, फळमाशी, ज्वारी व मक्यावरील खोडकिडा, टोमॅटोवरील सूत्रकृमी, कोळी, लाल कोळी, नाकतोडा, लाल ढेकूण, शेंडे व पाने पोखरणारी अळी, लष्करी अळी, झुरळाच्या प्रजाती, धान्य साठवणुकीतील किडे, मेंढ्यावरील माश्या इत्यादी किडींचासुद्धा प्रादुर्भाव कमी करणसाठी बहुमूल्य अशा या घटकांचा उपयोग होतो. विषाणूविरुद्ध क्रिया करण्यासाठी उपयुक्त असल्याकारणाने या घटकाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. पिकांवरील किडी तसेच जनावरांच्या विषाणू रोगांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती या घटकांमध्ये आढळते. कडूिंलबाच्या अर्काद्वारे किडींच्या नियंत्रणाचा मार्ग : कडूनिंबापासून तयार करण्यात आलेला अर्क किडीस अंडी घालण्यास प्रतिबंध, अंडीनाशक, कीडरोधक, दुर्गंध रोधक, किडीस खाद्यप्रतिबंधक, कीड वाढरोधक व कीटकनाशक या विविध मार्गाने परिणाम करते. कडूनिंबाच्या सर्व भागापासून विविध प्रकारच्या 400 ते 500 प्रजातींवर प्रभावी वनस्पतिजन्य कीटकनाशक असल्याचे आढळून आले आहे.
[5/3, 1:17 PM] मिलिंद जि गोदे: नमस्कार मंडळीआपन शेतकरी वर्ग काही लहान लहान गोष्टीला फार गांभीर्याने घेतच नाही. शेती कोरडवाहू असो की बागायती असो सर्वाचा प्रश्न सारखाच की माती निकस झाले कि काय? मि आता रोखठोक बोलतो आपल्याला सवय झाली आहे की आपन बाईक मधले पेट्रोल संपेपर्यंत आपन तिला चालवतो आहे तसंच आपन आपल्या जमिनी सोबत केलें आहे सुपिकता संपेपर्यंत आपन उत्पादन घेत असतो.मला सांगा हे कीती योग्य आहे
आपन फक्त कामापुरते उपाय योजना करण्याची सवय झालेली आहे . आपल्याला फुकटाच उत्पादन पाहिजे मग त्यानंतर परीनाम काही होवो काहीच लेणं देणं नाही. आपले शेतकरी मित्र फक्त फायद्या साठी भविष्यातील संकटांना स्वतः हून आमंत्रण देत आहे कारन त्यामागचे कारण आपले अज्ञान किंवा शेती बद्दल च अपूर्ण ज्ञान हे आहे. मित्रहो मातीच्या आरोग्यावर जर आपण भर दिला तर भविष्याचा उद्देश ठेवून शेती च नियोजन करता येऊ शकते ! मातीच्या आतली सुपिकता हे यशस्वी शेतीचे रहस्य आहे.आपन शेती मधेआधुनिक तंत्राचा वापर जरूर करा पण त्यांच्या मर्यादा ओळखा कोणत्याही फायदा सांगताना त्यांची मर्यादा सांगणे आवश्यक आहे कारन फायदा करुण घेणारे कमी आणि दुष्परिणाम करुण घेणारे जास्त असतात.
आज शेतकरी वर्ग काही गोष्टी ने निराश व हतबल होत चालला आहे शेती मधल्या मातीच त्याच बरोबर आपल्या पिकाचं तंत्र समजून घेतच नाही.आपल्या विचार बदलायला हवा!माझा शेतकरी हा एक दाना माती मधे पेरून हजारो दाने निर्माण करनारा आहे पण त्याचं रूपांतर उत्पादन घेण्यासाठी तो कधी कधी कमजोर पडतो. फक्त आम्ही ती कशी पिकवतो ह्याचे चिंतन व्हायला हवे , त्या शेतमालाची क्वालीटी ,पौष्टीकता सुरक्षीतता आपन जपायला हवी.
काही गोष्टी सर्वसामान्यांना समजण्याच्या पलीकडे आहे जीवनभर जो शेती करत असेल व शेती मधे खर्च वाढल असेल तर उत्पादन खर्च जास्त होत असेल तर आपन कोठेतरी चुकीचे करत आहे.आपल्या शेतकरी मित्रांनी एक गोष्ट शिकायला हवी आपल्याला जशी प्रत्येक गोष्टीची गरज आहे तशीच आपल्या झाडांनासुद्धा गरज आहे. त्यामुळे सतत आपण आपली अभ्यासु वृत्ती जपली पाहिजे.
शेती बलवान तर शेतकरी धनवान
धन्यवाद मित्रांनो
मिलिंद जि गोदे
9423361185
Mission agriculture soil information
Save the soil all together
milindgode111@gmail.com
पण ते स्वतः अनुभव घेतील कि ते किती मोठी चूक करत आहे आपल्या हातने स्वतः चे नुकसान करून घेत आहे हे लक्षात येईल
पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....
*पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा