नमस्कार मित्रांनो आपण शेती करत असताना अभ्यासपूर्वक शेती करणे हि काळाची गरज आहे.
नेहमी शेती ही परीक्षा घेत असते शेतीमध्ये अभ्यास करणे म्हणजे असे नाही कि, सतत पुस्तके घेवून अभ्यास केला पाहिजे आणि त्यातून शेती केली पाहिजे. आपल्या पुस्तकांमधून माहिती मिळते हे खरे आहे. परंतु त्या सर्व गोष्टी सर्वांनाच वेळेवर उपलब्ध होतील असे नाही. तसेच त्या सर्वांनाच समजतील असेही नाही. कारण शेती हा प्रात्यक्षिक विषय आहे. अनेक वेळा आपण शेतात विविध पिकांची लागवड करतो. त्यात काही गोष्टी असतात ज्या नवीन पद्धतीने केल्या जातात. त्यातून काही बदल बघायला मिळतात. काही ठिकाणी मात्र असे होताना दिसत नाही. शेती हा सतत बदलाचा विषय आहे. त्यात नवीन होणारे बदल स्वीकारणे देखील तितकेच महत्वाचे आहे. मागच्या वेळी घेतलेले पिक त्यात काही आपण चांगले करतो तर काही बाबतीत काही त्रुटी राहून जातात. ज्यामुळे काही नुकसानास सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टी अभ्यासाच्या आहेत एका वेळी झालेली नुकसानी गोष्ट नंतरच्या वेळी टाळता आली पाहिजे. तेव्हा तो भाग होतो अभ्यासपूर्वक शेती करण्याचा.
शेतीमध्ये अनेक प्रकारचे बदल हे काळानुसार स्वीकारले गेले पाहिजे. वातावरणात अचानक होणारे बदल त्यामुळे होणारे नुकसान या गोष्टी आज नाही होत आहेत. सातत्याने या बाबी होत आल्या आहेत आणि अजूनही होतच आहेत. यावर काहीतरी अभ्यासपूर्वक उपाय शोधणे हे तुम्हा आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या घडवणे आपण टाळू शकत नाही. जे आपल्या हातातले आहे त्यात मात्र आपण बदल निच्छितच करू शकतो. होणारे नुकसान टाळू शकतो किंबहुना होणाऱ्या नुकसानीचा दाह कमी करू शकतो.
शेतीत विविध शेती पद्धती आहेत त्यात बागायती शेती, कोरडवाहू शेती इत्यादी. तसेच विविध प्रकार आहेत शेतीचे त्यामुळे योग्य त्या गोष्टीची निवड झाली पाहिजे. फळबागा लागवड वाढवली पाहिजे. बरेच असे फळबागा आहेत जे कुठल्याही जमिनीत येवू शकतात व चांगले उत्पादन देखील देवू शकतात. त्यामध्ये नगदी पिके घेता येतात. एखाद्या पिकाचे वातारण किंवा इतर काही कारणांमुळे नुकसान झाले तर दुसऱ्या पिकाचे उत्पादन मिळेल अशा रीतीने शेती पद्धतीत बदल होणे अगत्याचे बनले आहे.
पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....
*पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा