नमस्कार मित्रांनो मि मिलिंद जि गोदे आपला शेतकरी वर्ग शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. गावातील लोकांची उपजिविका म्हणजे शेती व्यवसाय सर्व शेतीवर अवलंबून आहे.त्या मध्ये बरेचसे शेती क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खात्रीशीर उत्पादन मिळण्याची हमी नसतेच. मर्यादित जमिनीचे क्षेत्र उपलब्‍ध असल्याने आणि सिंचनाच्या सुविधा मुबलक नसल्याने याच क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. तुमच्या लक्षात येईल की माती पिकाच्या मुळाला आधार,अन्न पुरविणारी यंत्रणा म्हणजे जमीन होय. तिच मुलद्रव आणि पाणी पुरवठा करण्याचे काम करत असते.जमिनीला जिवतं करण्याचें काम अहोरात्र कोट्यवधी जीवाणू अभिक्रियांद्वारे मातीच्या जडण घडणाचे काम करतात. म्हणून माती हे सजीव माध्यम आहे. कोट्यवधी सूक्ष्म जिवाणूंनी समृद्ध, पोषक अन्नद्रव्ये, हवा आणि पाणी असा सुवर्ण संगम साधलेले माध्यम म्हणजे माती हेच मानवी संस्कृतीच्या विकासाचे उगम स्थान आहे. म्हणून मातीला आपल्या काळी आई म्हणुन संबोधले जाते. शेतीसाठी तर मातीचे महत्त्व फारच आहे हे आपणास माहीत आहेत.ज्या मातीत ४५ टक्के मातीचे कण, २५ टक्के पाणी, २५ टक्के हवा आणि ५ टक्के सेंद्रिय कर्ब असते ती पिकाच्या वाढीसाठी आदर्श माती! हे प्रमाण जर बिघडले तर मातीचे आरोग्य बिघडले असे समजा.आपल्या पिकाच्या वाढीसाठी १७ अन्नघटक लागतात. यापैकी एक अन्नघटकाची जरी कमतरता भासली तर पिकाच्या वाढीवर आणि पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. सुपीक मातीत सर्व अन्नघटक पुरेशा प्रमाणात असणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे ज्या पिकाला उपलब्ध होतं ते पिके उत्तम अशा स्वरूपाचे असतात. आता पाहु जमिनीचे आरोग्य कसे बिघडत असते.रासायनिक खत हे पिकाचे अन्न आहे जे कमी मात्रेत अधिक अन्नद्रव्ये पिकाला हवे तेव्हा उपलब्ध करतात. जमीन खराब होते रासायनिक खतांच्या चुकीच्या पद्धतीने वापर व शिफारसीपेक्षा जास्त वापरामुळे! खऱ्या अर्थाने मातीचे आरोग्य बिघडते ते पाण्याच्या जास्त वापरामुळे. पिकाला पाणी दिल्यानंतर ते पाणी पीक मुळावाटे हवे तेवढे शोषून घेते, बाकीचे जमिनीत साचून राहते. साचलेले पाणी मातीमधील हवा बाहेर काढून त्याची जागा घेते. वेळीच पाण्याचा निचरा नाही झाला तर पिकाची मुळे गुदमरतात. झाडाची वाढ खुंटते. साचलेल्या पाण्यात मातीतील क्षार विरघळतात. सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन होते मात्र पाण्यातील क्षार जमिनीवर मातीच्या कणात अडकून राहतात. कोणत्याही पिकाला जेव्हा शेतकरी सतत पाणी देतात तेव्हा अशा जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढते. क्षार मातीचे कण जोडतात. माती कडक होते. मातीचे रंध्र बंद होतात. पाणी मुरत नाही. ओलावा टिकत नाही. परिणामी पिकाची वाढ होत नाही आणि अपेक्षित उत्पादन मिळत नाही. म्हणून जास्त पाणी देणे कधीही घातक असते हे लक्षात घेऊन शेती करणे.माती परीक्षण अहवालनुसार खते वापरल्यास मातीचे आरोग्य उत्तम राहिलच आणि उत्पादनसुद्धा वाढणार आहे....... मिलिंद जि गोदे 🙏 milindgode111@gmail.com Mission agriculture soil information ९४२३३६११८५ विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....

सहज व शक्य शेती...... मिलिंद जि गोदे