*मृग या नक्षत्राच्या मुहूर्तावर शेतकरी वर्ग पेरणीस सुरवात करत होते.त्यापूर्वी किमान आठ ते दहा दिवस पेरणीची पूर्वतयारी करण्यात शेतकरी मग्न असायचा आता काळानुसार बदल होत गेला कमी मेहनत करून जास्त नफा मिळावा व कमी वेळेत अधिक लाभ व्हावा हा नव्या पिढीने आपला स्वभाव बनवीला आहे.पूर्वी शेतकरी वर्षांतून एकच पीक घेतं होते तर काही ठिकाणी दोन पिके घेतली जातात. आता वर्षांतून चार पिके घ्यावीत असे प्रयोगही अनेक जण करत आहेत हे कीती योग्य आहे देव जाणे पण सुपीक जमिनीचे क्षेत्र दरवर्षी कमी होत असून शेती मधुन निघणार्या उत्पादनावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या मात्र वाढतंआहे.त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढवण्याला आपल्या जवळ आता तरी पर्याय नाही.*

टिप्पण्या