नमस्कार मंडळी आज काळाला गरज आहे माती मधला कर्ब च्या नियोजनाची पण शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांचे सेंद्रिय कर्बाबाबत अनुभव समजून घेताना,एक गोष्ट जाणवलीकि,अगदी मोजक्याच शेतकऱ्यांना सेंद्रिय कर्बाचे महत्व माहीत आहे.बाकीच्यांना कर्बाच देणं घेणं नाही व बद्दल माहिती नाही.परंतु बऱ्याचदा शेतकरी भावनिक दृष्टीकोनातून किवा अपुऱ्या माहितीतून सेंद्रिय शेतीकडे वळतात.शेतीमध्ये भावनिक दृष्टीकोन ठेवण्यात काहीच गैर नाही,पण अपुरी माहिती कधीही तोट्याचीच.आताअसे पाहू कि अगदी १०० % शुद्ध सेंद्रिय शेती करताना सर्वात महत्त्वाचा घटक ‘सेंद्रिय कर्ब’ (Organic Carbon) म्हणजे काय ? आणि सेंदीय कर्ब इतके महत्वाचे का ? अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सेंद्रिय कर्ब म्हणजे मातीतील कुजलेला काडी-कचरा (झाडाची पाने /मुळे,प्राणी/ एखादया प्राण्यांची विष्ट इ.). एखादी गोष्ट जेव्हा मातीत कुजते तेव्हा त्याचे रुपांतर सेद्रिय कर्ब (Carbon) मध्ये होते.सुक्ष्म जिवाणु पासून ते सर्व प्राण्यापर्यंत सर्वाचे जीवनमान कर्बा वर चालते.जसे पाण्याचे चक्र आहे तसेच कर्ब चे ही चक्र चालूच राहते सेंद्रिय कार्बामध्ये साधारणता ६५% ह्युमस (Humas) म्हणजे जुन्या सेंद्रिय कर्बा मध्ये रुपांतरीत झालेला भाग असतो ,तर तितकेच महत्वाचे म्हणजे त्यात१० % पर्यंत जिवंत जीवाणू असतात. असे हि म्हणता येईल कि सेंद्रिय कार्बा मुळेच मातीचा कस वाढून जिवंत पण येतो. सेंद्रिय कर्ब कमी होण्याची मुख्य कारणे –सध्या आपल्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब इतक्या मोठ्या प्रमाणावर कमी (०.१ ते १ %) असण्याचे मुख्य करण – व्यावहारिक शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिरेकी वापर , जमिनीत कुजणाऱ्या गोष्टींचे कमी होणारे प्रमाण पिक पलटणी न करणे ,मातीची मशागत मोठ्या प्रमाणावर करणे आणि जमिनीला विश्रांती न देणे ही दिसतात. नैसर्गिक शेती मध्ये जिथे जमिनीची मशागत कमीत कमी केली जाते अशा ठिकाणी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त आढळून येते.पण व्यवहारिक दृष्टिकोनातून बघताना जमिनीची मशागत न करणे हा पर्याय तरी आता शक्य दिसत नाही. आता हा महागमोलाचा सेंद्रीय कर्ब जमिनीत साठलाच नाही तर जीवाणूंना तो कोठून मिळणार ? मग त्यांची संख्या व कुजण्याची क्रिया कशी वाढेल ? मग पिकांना अन्न कसे उपलब्ध होईल ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....

सहज व शक्य शेती...... मिलिंद जि गोदे