नमस्कार मित्रांनो आजचा विषय खुप छान आहे वाचाल तर वाचाल आपल्या निसर्गाने प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार दिला आहे. वनस्पतींमध्येही ही स्वसंरक्षणाची प्रक्रिया निसर्गाने दिली आहे. मग या झाडातील नैसर्गिक स्वसंरक्षणाची प्रक्रिया वापरून त्या दृष्टीने पीक संरक्षणाचे उपाय शोधण्यास सुरुवात झाली.
पिकाच्या संरक्षणाचा विचार करण्याआधी पिकावर रोग, कीड का येते याचा शोध घेणे सुरू झाले तेव्हा असे लक्षात आले, की निसर्ग सगळ्यांना समान वागणूक देत असतो. किड्यांना, जंतूंना त्यांचे अन्न शोधण्यासाठी विशेष ज्ञानेंद्रिये दिलेली असतात. झाडावर वाढणार्या किडींना त्यांच्या कोणत्या झाडावर आपल्याला अन्न मिळेल, आपली वाढ कोणत्या झाडावर चांगली होईल याचे ज्ञानही होत असते. आपण बॅक्टेरिया सारखे परोपजीवी जंतू प्रयोगशाळेत इनक्युबेटरमध्ये वाढवतो. त्यामध्ये त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करतो. थोडक्यात, कीड जेव्हा झाडावर येते तेव्हा झाडावर त्यांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. झाड इनक्युबेटरचे काम करते. अशक्त असलेले झाड किडीला निमंत्रण देते. कीड त्या झाडाकडे आकर्षित होते आणि आपल्याला झाडावर कीड आलेली दिसते. तुमच्या शेतातली काही झाडे निरोगी असतात तर काही किडीने ग्रस्त असतात.
हवामानात सतत होणारे बदल हे एक महत्त्वाचे कारण आहे असे लक्षात आले. बाहेरच्या हवामानातल्या बदलाप्रमाणे झाड आपल्या आतल्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणत असते. या बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेत झाडाची बरीच ऊर्जा वापरली जाते. ही ऊर्जा वापरली गेल्यामुळे झाडातल्या ऊर्जेचा असमतोल निर्माण होतो आणि झाड किडीला निमंत्रण देते.
झाडातल्या ऊर्जेचा असमतोल होण्याची कारणे पाहिली, समजली की त्यावर उपाय करणेही सोपे होईल व त्यातून कीडरोग नियंत्रण करणे सोपे होईल.पिकाचे पोषण पहिल्यापासून उत्तम झाले की दुहेरी फायदा होतो. तो म्हणजे किडीवर लवकर नियंत्रण येते आणि उत्पादनातही वाढ होते. झाडाच्या पोषणप्रक्रियेत एन, पि के आणि सूक्ष्म अन्नघटक यांचा जेवढा सहभाग आहे तितकाच सहभाग सिलिका व कार्बन यांचा आहे. पीक संरक्षणाच्या कार्यक्रमात तर त्यांचा फार मोठा सहभाग आहे आणि त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....
*पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा