मातीमधल्या जिवाणूंना संपवायचं नाही संवर्धन करायचं आहे! ........ मिलिंद जि गोदे........ नमस्कार आजच्या लेखात आपल्याला जिवाणू संवर्धनाची गरज का आहे हे वाचायला मिळेल.आजच्या काळात शेतकरी मित्रांनो उत्पादन जास्तीत जास्त कसे घेऊ ही जणु काही स्पर्धा लावलेली आहे असे वाटतंय शेत जमिनिचा स्तर कोठे चाललाय यांच्या वर लक्षच नाहीच आहे. जमिनीचां नैसर्गिक जो गुणधर्म आहे तो बिघडत चालले आहेत. मातीमधला घट्टपणा वाढत चालला हे लक्षण दिसत आहे. त्या मधे जमिनींचा सामू वाढत आहे. जमिनींची मोठी धूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जमिनी क्षारयुक्त आणि चोपण बनण्याच्या समस्याही वाढत आहेत. मातीतील सुपीकता व कच खालावत चालल्यामुळे खतांवरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. जमिनीची सुपीकता हा जमिनींचा बदलत जाणारा गुणधर्म आहे हे लक्षणे जिवाणू चे संवर्धन नसल्यामुळे झाले आहे. हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.आज जर मातीमधले जिवाणू वाचवली तर जिवाणू आपल्याला मातीत जाण्यापासून वाचलेलं ! जीवाणू संवर्धन म्हणजेच जीवाणू खते ज्यात नत्र उपलब्ध करून देणाऱ्या व जमिनीतील स्फुरद विरघळविणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंच्या गटाचे मिश्रण असते. वनस्पती सेंद्रीय पदार्थ निर्माण करतात. जंगलातील झाडांची पाने, काटक्या जमिनीवर पडतात, वारा व वादळाने झाडे मोडून जमिनीवर पडतात, शाकाहारी प्राणी वनस्पती खातात आणि त्यांच्या विष्टेतून सेंद्रीय पदार्थ बाहेर पडतात. मासांहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खात तेव्हा त्यांचे विष्ठेत सेंद्रीय पदार्थ असतात. शेतीतील पिकांचे अवशेष जमिनीत मिळतात. मेलेल्या मुळया जमिनीत कुजतात. गुरे, शेळया-मेंढया, रानात चरतात तेंव्हा त्यांचे शेण व लेंडया जमिनीवर पडतात. शेणकिडे (भुंगे) शेणाचे गोळे करुन आपल्या बिळात नेतात व शेण खातात जमिनीत राहणारे कीटक, लहान प्राणी व जिवाणू मरतात तेंव्हा त्यांचे शरीरातील सेंद्रीय पदार्थ जमिनीत मिसळतात. अशाप्रकारे जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजविण्याच्या विविध अवस्था असतात. कच्चे सेंद्रीय पदार्थ आपणास ओळखता येतात, पण ते पुर्णपणे कुजल्यानंतर त्याचा मूळचा आकार राहत नाही. तेंव्हा त्याला ह्युमस असे म्हणतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....

सहज व शक्य शेती...... मिलिंद जि गोदे