नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं माती ही आपल्या शेतीचा मुख्य आधार आहे. मातीशिवाय ही शेती उत्पादन होऊच शकत नाही हे शाश्वत सत्य आहे शेती करण्याची नवनवी तंत्रे जरी विकसित झालेली असली तरी मातीचे महत्त्व हेअनन्य आहे आणि स्वरुप तसेच राहणार आहे. माती ही वनस्पती ची आई' आहे. वनस्पतीला पक्के माहीत आहे की, मी जगतो ते मातीच्या शुद्ध पान्हयावर हा पान्हा जर मी शुद्ध ठेवला नाही तर माझ्या वनस्पती ची पुढची पिढी सकस होणार नाही. जगण्याचा कस आज वनस्पती ओळखून आहे. म्हणून प्रत्येक वनस्पती मातीशी इमान राखते आणि आकाशाचा आदर करते. ही जगण्याची विराट वृत्ती जिवनदाय करते. जीवनातील मातीचे हे महत्व समजून घेऊन तिचे आरोग्य चांगले कसे राहील याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. या दृष्टीने माती आरोग्याशी संबंध असलेल्या काही गोष्टींकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. शेतीतल्या मातीत १ ते ६ टक्के वजनापर्यंत सेंद्रिय पदार्थ असतात. जमिनीत एकूण जे सेंद्रिय पदार्थ असतात त्यापैकी १५ टक्के जिवाणू हे सेंद्रीयत्वाचे प्रतिनिधित्व करीत असतात. जगातील जैवविविधतेचा अभ्यास केला असता मातीतील जीवाणूचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत आढळून आले. मातीतील सेंद्रिय पदार्थांचे कर्बाचे प्रमाण १ टक्क्यांनी वाढले तर उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची क्षमता असते असे अभ्यासात आढळून आले आहे, मात्र पाट पद्धती व प्रवाही पद्धतीने पाणी दिल्यामुळे मातीचा दर्जा व पोत घसरतो असा निष्कर्षही काही संशोधकांनी काढला आहे. माती आणि पाणी यांचे हे अतूट नाते समजून न घेता मोकाट पद्धतीने प्रचंड पाणी वापरून आपण जमिनीची उत्पादकता कमी करतो आहोत. म्हणजे आपल्या स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आहोत. तेव्हा शेतकऱ्याला उत्पादन व उत्पन्न यात मोठी वाढ घडवून आणायची असेल तर पिकांना पाणी देण्याच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सूक्ष्मसिंचन पद्धतीकडे गेले पाहिजे. पाण्यातूनच उत्पादकतेचे अंतिम टोक गाठता येऊन मातीचे आरोग्यही कायम उत्तम रितीने सांभाळले जाऊ शकते हे जगातील अनेक देशांनी सिद्ध तर केले आहे.
माती आपल्या सर्वांसाठी जगते. कधी तरी आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारून पाहा जी माती आपल्याला भरभरून देते आणि सुखसमृद्धीच्या वाटेवर नेते तिची प्रकृती चांगली राहावी म्हणून आपण किती काळजी घेतो. इतके पर्यावरण व निसर्गाचे संवर्धन आपण केले पाहिजे. पण आपण बरोबर त्याच्या उलटे वागतो. निसर्गाचा व पर्यावरणाचा नाश करण्यातच मोठेपणा व धन्यता मानतो. कुठलीही माती ही कधीच टाकाऊ नसते. तिच्यात काही ना काही निर्माण करण्याची उपजत ताकद असते. आपण मातीचे ते सामर्थ्य व अंगभूत गुण लक्षात न घेता तिच्याकडून नको नको त्या मयदिबाहेरच्या अपेक्षा ठेवत असतो; प्रसंगी तिचा अनन्वित शोषण करतो. मुकी असल्यामुळे ती बोलत नाही पण ती मृत नाही. ती जिवंत परीसंस्था आहे .वेळ येताच बरोबर फटके लगावते आणि तिच्यातील अंगभूत सामर्थ्याचे दर्शन घडविते. म्हणून माणसांनी मातीला जपले पाहिजे. तिची योग्य निगा राखली पाहिजे. तिचा दर्जा व पोत ढळणार नाही आणि धूपही होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. आजकाल मातीची विक्रीही मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. शेतातली माती विकणे म्हणजे आपल्या मातेला विकण्यासारखे आहे. याचे भान ठेवले पाहिजे.....
पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....
*पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा