*आजची शेती आणि उत्पादन समस्या*
नमस्कार मित्रांनो मि मिलिंद जि गोदे शेती आणि माति च्या संदर्भात लेख लिहत असतो. आपन भविष्यात शेती कशी करु यावर विश्लेषण केले आहे.आपन वाचाल मला आशा आहे.आपली शेती आजची नाही ही आपल्या पुर्वजांनी दिलेली भेट म्हणजे आजची शेती! सुपिक मातीची देणं आपल्या साठी सोन्याचा भरलेला घडा म्हणजे आपली शेती!मि हे पुन्हा पुन्हा शेती चे गुणगान का केले असल?
कारण कुण्या कुण्या भागात जमिनीवर गवतही उगवत नाही या साठी तुम्हाला या क्षेत्राचे विचार सांगावे वाटतात.पुन्हा विषय मांडतोय आजची शेती ही आता पुर्वी सारखी रहालीच नाही.
भविष्यात शेती कशी राहील हेही माहीत नाही.आपन आधुनिक शेतीच तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे पण त्या बरोबर जमिन चे घटते प्रमाण व उत्पादनात वाढ करणे महत्त्वाचे आहे.उद्याला आपले पारंपरिक बिज रहाणार च नाही त्याचं कारण नविन संकरीत वाण व त्यामधे जनुकिय बदल होणार त्यामधे समस्या निर्माण होऊ लागेल.आपन आपल्याच शेतकरी मित्राची स्पर्धा करतो कधी कधी आपन गरजेपेक्षा अधिक पाले भाज्या पिकवतो भाव एकदमच कमी होते आणि त्या फळभाज्या कींवा पालेभाज्या रस्त्यावर फेकावा लागतो कारण नाशवंत असतात ठेवताही येत नाही.आपल्या समोर त्या दिवसात एकच पर्याय उरतो की आज शेतीचा व्यवसाय तोट्याचा झालेला आहे.मनात शेती बद्दल नकारात्मक विचार आपन दुसर्यांना सांगत फिरतं असतो. आपल्या शेतकऱ्याला समाधानकारक उत्पन्न मिळू शकत नाही. अनिश्चित पावसामुळे शेती च वेळापत्रक कोलमडून जाते. वारंवार पडणारे दुष्काळ आणि भूजलाच्या घटत्या प्रमाणामुळे सिंचन अवलंबून राहता येत नाही. शेतमजूर ही दुर्मीळच होत आहेत. लहान शेतकऱ्याला यंत्रसामुग्री आणि कुशल मनुष्यबळ परवडत नाही.
त्या मधे पावसाळ्यात पाऊस कमी झाला तरी शेतकऱ्याला समस्या आणि जास्त झाला, तरीही समस्या आहेच.
पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....
*पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा