मातीचे शोषण नाही तर पोषन करा! 
 मिलिंद जि गोदे नमस्कार मित्रांनो हा लेख आपल्या शेती मातीशी निगडित आहे आपन आपल्या जमिनीत उत्पादन घेत आहोत तिचा पोत राखण्यात आपण कोठे तरी कमी पडत आहे. बेसुमार रासायनिक खते व किटक नाशकांमुळे उत्पादनात वाढ झाली खरी पण नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची आपल्या जमिनीची गरज पूर्ण होऊ शकत नाही. ज्यामुळे जमिनीचा पोत टिकण्यास मदत करणारे सेंद्रिय पदार्थ जमीनीत टाकण्याचे प्रमाण कमी झाले. जमिनीचे आरोग्य बिघडण्यास मदत झाली. सुपीक असलेल्या जमिनी आता नापीक होत गेल्या यांचे कारण काय असु शकते मित्रांनो आपल्या शेतात रासायनिक खतांच्या असंतुलीत व बेसुमार वापरामुळे जमिनीत जैविक घटकांचा विनाश होऊन जमिनी मृत झाल्या. खतांची कार्यक्षमताही कमी झाली. कमी कार्यक्षमतेमुळे पुन्हा वाढीव वापर आणि पुन्हा जमिनीचा ऱ्हास दृष्टचक्रात आपल्या नविन उत्पादन पध्दती मधे अडकलेल्या आहे. तिचे एक प्रकारे शोषन झालं मला शेतकर्याना हेच सांगायचे आहे की माती बाबत जागरूकता निर्माण करणारी यंत्रणा तयार व्हावी.वेळोवेळी मातीचे महत्व हे शेतकरी यांना समजावून सांगणे.जमीन, जमिनीची उत्पादन क्षमता ही निसर्गाची देणगी आहे. जमिनीचे गुणधर्म टिकविणे किंबहुना सुधारणे आणि उत्पादन क्षमता टिकविणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे.आपली जमीन नापीक अवस्थेत पोचली आहे. याचा अर्थ असा की पंचवीस ते तीस वर्षांच्या कालावधीत, आपण या देशात आवश्यक असलेले शेती चे उत्पादन घेण्यासाठी कदाचित सक्षम राहणार नाही हे लक्षात घ्या.मित्रानों आपण मातीची गुणवत्ता गमावत आहोत आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना आपली पुढची पिढी शेतीत जावी असे वाटत नाही. याचा अर्थ असा की आणखी पंचवीस वर्षांत आपण नक्कीच अन्नधान्याच्या मोठ्या महा संकटात सापडणार आहोत.आता मातीचे महत्व जाणवणे महत्वाचं आहे आपन आपल्या शेतात कोणत्याही प्रकारची उत्पादने घेतोय त्या शेतातल्या मातीत आपन बिज पेरणी केली तर त्या शेतामध्ये एका बियांचे हजार बी तयार होते. या त्या झाडाला निर्माण झालेले १००० बि काही बाहेरून आणून कोणी त्या झाडाला लावलेलं नाही ही प्रक्रिया माती मधुन ते तयार झाले आहेत. हे लक्षात घ्या त्यांना तयार करण्याची प्रक्रिया जैविक प्रक्रिया आहे. ती मातीतच होऊ शकते. कारण माती हा जैविक सजीव घटक आहे. निसर्गाने शेतीला, बियाणांना आणि मातीला दिलेले हे एक अजोड वरदान आहे. आई मुलाला जन्म देते आणि नंतर त्याचे भरण-पोषण करते तशी ही काळी आई तिच्या पोटात तयार होणार्‍या या पिकांचे भरण-पोषण करत असते. वसुंधरा आहे!आपन तिचेच शोषन करीत आहे .आता आपल्या जागृत होण्याची वेळ आहे .आता नाहि तर केव्हाच नाही मित्रांनो! जर जमीन आरोग्य सुदृढ ठेवायचं असेल तर शेणखत व कंपोष्ट खताचा वापर, रासायनिक खतांचा असंतुलित वापर टाळणं खतांच्या चुकीच्या मात्रा व त्या देण्याची अयोग्य पध्दती टाळणे आणखी पाण्याचा योग्य वापर व पाण्याचा अतिवापर टाळणे गरजेचे आहे. आपन जसे आपल्या डोळ्याने दिसू शकणाऱ्या घटकांची कळजी घेतो त्याप्रमाणे डोळ्यांने न दिसणाऱ्या मित्रसूक्ष्मजीवांचे संवर्धन करणे नितांत गरजेचे आहे. ति काळाची गरज आहे मंडळी आपल्या शेतात मित्रजिवाणू तसेच मित्रजीवाणू पोषन, संवर्धन होईल हे बघितले जाणे तितकेच शेती मध्ये महत्वाचं आहे.... धन्यवाद मित्रांनो आपला मित्र मिलिंद जि गोदे Mission agriculture soil information milindgode111@gmail.com Agriculture development and technology group Amaravati

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....

सहज व शक्य शेती...... मिलिंद जि गोदे