नमस्कार मंडळी पुन्हा नविन माहिती शेती ला अनुसरून आहे. वाचला तर वाचाल आपला देश हा कृषिप्रधान प्रधान देश आहे.हे ऐकून कान बधीरले असेल मित्रांनो आज आपल्या साठी शेतीचे येणारं वार्षिक उत्पादन हा महत्वाचा मुद्दा आहे. काही शेतकऱ्यांसाठी तर शेती हे एकच उपजीविकेचे एकमेव साधन आहे.कुठला ही जोडव्यवसाय नाही.परंतु काही शेतकरी त्या मधे पिकांचे उत्पादन घेताना नवे तंत्र आणि शेतीतील पद्धतींचा वापर करून पिकांचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न प्रत्येक शेतकरी करत असतो पण पारंपरिक पद्धतींपेक्षा आधुनिक पद्धती किंवा दोन्ही पद्धतींचा जर समन्वय साधला तर चांगले परिणाम मिळू शकतो. आता पाहू आपले पिकाचं
उत्पादन वाढविण्याची पध्दत
मित्रानों आपल्याला उत्पादनात महत्वाचा भाग म्हणजे मातीच व्यवस्थापन हे होय. पेरणी साठी करण्यापूर्वी योग्य बी तयार करणे व साठवणुक करून व्यवस्थीत सुरक्षित ठिकाणी ठेवणे दुसरं महत्त्वाचं म्हणजे
पेरणी करत्यावेळी बुरशीनाशक किंवा जिवाणू संघाने बिजप्रकिया करणे कींवा बुरशीनाशक ची फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून आपल्या बियाणांना संरक्षण मिळेल. यामुळे काय होते की रोपटे मजबूत होऊन मातीतून अधिक चांगले पोषक घटक शोषण्यास मदत मिळते.
अशा उत्पादनांचा वापर करून, एक उच्च दर्जाचे पिक घेता येणे शक्य आहे .सूक्ष्म पोषक घटकांचा संतुलित आहार
पिकांना पोषण मिळावे यासाठी डीएपीचा वापर करताना आपण कमी प्रमाणात आवश्यक असलेल्या घटकांनाही विचारात घेतले पाहिजे. चांगले पिक घेण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. .
या सूक्ष्म पोषक घटकांमध्ये प्रामुख्याने झिंक, बोरॉन इत्यादींचा समावेश असतो, जे मातीचा पोत वाढवतात. आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांसह, इतरही आवश्यक घटकांचा विचार केला पाहिजे.
संशोधनानुसार, झिंक ३३%च्या तुलनेत झिंक १२% हे एक हाय-ग्रेड उत्पादन आहे. कारण याची डीएपीप्रमाणे इतर उत्पादनांसोबत प्रक्रिया होत नाही. तसेच झिंकची खूप कमी प्रमाणात आवश्यकता असते. जे झिंक ३३% च्या तुलनेत खूप वेगाने शोषले जाते. त्यामुळे योग्य उत्पादन आणि योग्य पोषणाचा वापर केला गेला पाहिजे.
वनस्पती पोषक घटकांची कमतरता असल्याची अनेक लक्षणेही दिसतात. उदा. पाने पिवळी पडणे, करडे डाग सुरकुत्या येणे इत्यादी. या लक्षणांची माहिती घेणे आणि रोपट्यांतील उणीवा लक्षात घेऊन योग्य वेळी आवश्यक प्रमाणात पोषक घटक पुरवणे आवश्यक आहे.मजबूत मूळे ही उत्तम पिकांचा आधार
जिबरेलिक ॲसिड या संजिवक मुळे पिकांची मुळे पोषक घटकांना उत्तम प्रकारे शोषून घेऊ शकतात यामुळे पिकांची ताकद वाढते.
ही हाय-ग्रेड उत्पादने असून बिजाचे वेगाने अंकुरण होऊन पिकांमध्ये रुपांतरीत होतात. यामुळे पिकांवर रोगराई कमी प्रमाणात पसरते. फुलांची संख्या वाढवण्यासही यामुळे मदत मिळते, परिणामी उत्पादनाचे प्रमाण वाढते.
पिकाच्या विकासातील प्रारंभिक टप्प्यांदरम्यान पिकांच्या उत्पादनात वाढ करणे शक्य आहे, याचा विचार सर्वप्रथम झाला पाहिजे. त्यानंतरच्या टप्प्यांत पिकांचे उत्पादन सुधारणे आणि वाढवणे शक्य नाही.
आपण प्रमाणित जिबरेलिक ॲसिडयुक्त उत्पादनांचा वापर करू शकतो. जे पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी अद्भूत काम करू शकते.
कीटक व्यवस्थापन महामारी आणि कीटकांचे हल्ले नियंत्रित करायचे असतील तर, नेहमी कीड आढळणाऱ्या जागांचे निरीक्षण करावे. या टप्प्यांमध्ये सतर्कता असणे खूप आवश्यक आहे.
दर्जेदार उत्पादन म्हणजे तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या प्रमाणातच घेणे आवश्यक आहे. समाधानकारक उत्पादन घेण्यासाठी अखेरच्या शब्दापर्यंत निर्देशांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.प्रतिबंध हाच खरा उपाय शतकांपासून चालत आलेली ही म्हण शेतीबाबतही तंतोतंत लागू पडते.तज्ज्ञांचा सल्ला घेणे आपल्याला काही शंका असल्यास, शेती क्षेत्रातील प्रमाणित तज्ज्ञांशी चर्चा करणे सर्वात चांगले, ते आपल्या शंका दूर करण्यात मदत करू शकतात.
हे तज्ज्ञ शेतीसंबंधीत तुमच्या शंकेच्या समाधानासोबतच इतरही अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण सल्ला देऊ शकतात. वनस्पती रहस्य मय आजार किंवा पिकांवरील अज्ञात कीड, जी आपल्या संपूर्ण शेताला धोक्यात आणू शकते.
जे या क्षेत्राशी संबंधित सर्व समस्यांतील जाणकार आहेत अशा तज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही चांगलं. अशावेळी मदत आणि मार्गदर्शनासाठी आमचं के व्ही के घातखेड प्रतिबद्ध आहे व त्याचा हेल्पलाइनशी देखील संपर्क करू शकता.तज्ज्ञांच्या मदतीने शेतीसंबंधी प्रत्येक अडचणींतून मार्ग काढता येतील . आळी-पाळीने पिक घेणे पिकांच्या चक्राला खूप महत्त्व आहे. यामुळे माती पुन्हा नव्याने तयार होते.
पिकांमध्ये बदल केल्यास सतत एकच पिक घेतल्याने मातीवर येणारा अतिरिक्त ताण दूर करून तिला नव्याने तयार होण्यास मदत मिळते.याबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, काही पिके मातीतील पोषक घटक शोषत करतात तर काही पिके ते घटक मातीला प्रदान करतात.
विविध पिकांच्या शेतीसाठी आवश्यक घटकांद्वारे भरपूर सुपीक माती तयार करण्यासाठी दोन्ही बाजूंचे संतुलन करणे आवश्यक आहे. मातीला योग्य प्रमाणात पोषण देण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरू शकते. परिणामी पिक उत्पादनाचा दर्जाही सुधारतो.कार्यक्षमता वाढवणारे घटक औषधांची फवारणी पानांच्या काही भागावरच होते.
शेतीतज्ज्ञ, शेतकऱ्यांना स्प्रे ची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वेलवेटसारख्या ओल्या आणि सर्वोत्कृष्ट उत्पादानाचा वापर करण्याचा सल्ला देतात. समान प्रमाणात औषध संपूर्ण पानावर पसरण्यासाठी याचा उपयोग होतो. अशा प्रकारच्या उत्पादनाचा वापर केल्याने पाण्याच्या पृष्ठभागावरील ताण कमी होऊ शकतो आणि याचा प्रसार दर १० पटींनी वाढू शकतो.
पानांच्या बाह्य पृष्ठभागावर सततच्या औषधांच्या थरामुळे पिकाला विविध प्रकारच्या कीटकांपासून संरक्षण मिळते. यामुळे शेतकऱ्यांना कमी प्रयत्न आणि कमी खर्चात प्रभावी उत्पादन मिळवता येते.... धन्यवाद मित्रांनो. मिलिंद जि गोदे. mission agriculture soil information. Save the soil all together. milindgode111@gmail.com
पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....
*पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा