सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय करावे? कोणताही वनस्पती अगर प्राणिजन्य पदार्थ कुजतो व त्याचे खत होते. तर सेंद्रिय कर्ब वाढीसाठी फक्त शेणच का उपयुक्त धरायचं ? वनस्पती अगर प्राण्यांनी तयार केलेला कोणताही पदार्थ हा खतासाठी योग्य आहे असा एक पायाभूत नियम यातून तयार झाला.
पूर्वी माझ्या पुढे असा प्रशन पडायचा शेणाचे कुजून खत होते , पण पाळापाचोळ्याचे खत कसे काय होते. म्हणजे निसर्गात काही सजीवांना हे काम दिलेले आहे. कुजण्याची प्रक्रिया म्हणजे हे सजीव तो पदार्थ खातात. त्यांची विष्ठा व मृत शरीरे म्हणजे तपकिरी रंगाची भुकटीसारखा दिसणारा पदार्थ ज्याला आपण शेणखत किंवा कंपोस्ट असे म्हणतो.आमच्या सारख्या शेतकरी वर्गाची पालापाचोळ्यापेक्षा शेणखतावर जास्त भक्ती आहे. शुद्ध शेणापासून तयार झालेले खत म्हणजे सर्वांत उत्तम खत आहे . पालापाचोळ्यापासून तयार झालेले कंपोस्ट खत म्हणजे दुय्यम दर्जाचे अशी एक मानसिकता तयार झाली आहे. शेणाचा मूळ स्रोत वनस्पतीच आहे. कोणताही वनस्पती किंवा प्राणिजन्य पदार्थ कुजतो व त्याचे खत होते. आजवर शेताच्या बांधावरील झाडांच्या फांद्या जळणासाठी तोडल्या जातात. मोठ्या आकाराचे लाकूड जळणासाठी बाजूला काढून शेंड्याच्या लहान आकाराच्या फांद्या व पाने गाडीत भरून शेतातील एखाद्या मोकळ्या कोपऱ्यात फेकून दिले जाते. पुढे ती तेथेच कुजून संपून जातात परंतु त्यापासून खत होऊ शकेल, असे बरेच दिवस लक्षात आले नाही. वरील अभ्यास झाल्यानंतर अशा लहान फांद्या घराकडे न आणता उसाच्या सरीत विसकटून टाकून देणे सुरू झाले. पुढे पावसाळ्यात त्याचे खत होऊन ते अवशेष संपून गेले.याचे हे एक उदाहरण. आजवर शेणखताच्या ढिगात चुकून एखादे उसाचे खोडके गेले तर बाकीचे खत तयार झाले तरी हे खोडके जसेच्या तसेच फक्त थोडेसे काळसर झाल्याचे आढळले. रानात खत भरून नेताना हे खोडवे बाजूला फेकून देऊन बाकी खत रानात नेऊन आपण
टाकले . दुसऱ्या बाजूला हे खोडके चुलीत घातले तर उत्तम जळतात, मग हा पदार्थ खत करण्यासाठी नसून हे जळण आहे, असाच समज सर्वाचा आहे
पावसाळ्यापूर्वी मी असा विचार करीत होते की आता आपण उसाचे पाचट रानातच कुजवते पण ही खोडकी बाहेर जातात. हा आणखी एक पदार्थ रानातच कुजविता आला तर थोडा सेंद्रिय कर्ब वाढविता येईल. यावर खूप विचार केल्यावर असे वाटले की जमीन नांगरली तर ही खोडकी रानात विखरून पडतात. व पुढील कामात अडथळा करतात. मग खोडक्यांचे खत करावयाचे असल्यास ते जसे आहे, तसेच जागेला ठेवून कोणतीही मशागत न करता पुढील पीक घेता आले तरच हे खोडके जागेवर कुजविणे शक्य आहे. दुसरा मुद्दा असा आहे की हे खोडवे मरणे गरजेचे आहे. ग्लायसेल या तणनाशकाने खोडवे मारता येणे शक्य असल्याचे तोपर्यंत समजले होते.
जगात नांगरणी प्रथम का चालू झाली. ती आजवर टिकून का राहिली? आपण बैलाकडून ट्रॅक्टरकडे गेल्यानंतर शेतकऱ्यांचा मशागत जास्त करणेकडे कल वाढत चालला आहे. मुळात नांगरणीचा उद्देश काय असावा, यांचा शोध घेणे गरजेचे होते. शेतीशास्त्राच्या पुस्तकात नांगरणी चांगली कशी करावी याची माहिती मिळेल, मूळ उद्देश सापडणार नाही. चिंतन केल्यानंतर मला सापडलेले मूळ उद्देश खालीलप्रमाणे आहेत.
1) आपल्याला बी पेरता आले पाहिजे.
2) ओळीत करावयाचे असेल तर रानबांधणीसाठी नांगरणी
दुय्यम उद्देश
1) तण मारणे
2) सेंद्रिय खत मातीत मिसळणे
या उद्देशासाठी आपण जमिनीची मशागत करीत असतो.आपण शेतकऱ्यांना विचारल्यास शेतकरी सांगतील की पुढील पिकाच्या मुळांच्या चांगल्या वाढीसाठी जमीन भुसभुशीत करणे गरजेचे आहे. जमिनीत असणाऱ्या किडींच्या अवस्था मारणेसाठी नांगरणी गरजेची आहे. परंतु यात अर्थ नाही. वरील चार कामे आपण बिना नांगरता करू शकत असलो, तर आपल्याला नांगरणी पूर्वमशागत करण्याची कोणतीच गरज नाही. उसासाठी सुरवातीला सरीचे तळात कांडी पुरणे पुरती मशागत करीत होतो. आता तीही बंद केली कांडी लावणीसाठी एक डोळ्याची कांडी सरीत उभी घालणे अगर बाहेर रोपे तयार करून कुदळीने लहान खड्डा पाडून त्यात रोप लावले जाते. पाणी पाजण्यासाठी जुन्या सरी-वरंबे तसेच वापरले जातात. तण मारण्यासाठी तणनाशकाचा वापर केला जातो. चांगले कुजलेले खत आता वापरणे बंद केले आहे. शक्य झाल्यास जनावरांचे शेण विसकटून आच्छादनात टाकले जाते. सेंद्रिय खताची गरज प्रामुख्याने मागील पिकाचे अवशेष व तणांचे अवशेष जागेलाच कुजवून भागविली जाते. इथे सेंद्रिय खत मुद्दाम औजाराने मातीत कालविण्याचे कामच करावे लागत नाही. ही चार मुख्य कामे बिना नांगरता होऊ शकल्याने मागील 5 वर्षांपासून माझी शेती 100 टक्के नांगरणी शिवाय उत्तम प्रकारे चालू आहे
पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....
*पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा