*उत्पादन वाढवायचे आहे ना मग माती परीक्षण कराच...*
नमस्कार मित्रांनो मिलिंद जि गोदे आपन शेतकरी वर्ग दरवर्षी नवनवीन पिकांची लागवड करत असतो. मात्र आपन माती मधल्या असलेल्या मुलद्रव्याची व जमिनीच्या सुपिकतेची आपल्याला माहिती नसल्यामुळे जसे पाहीजेत तसे उत्पादन होत नाही.त्यामुळे काय होतं कि आपन पिकाच्या बाबतीत स्पर्धा चालू होते ति म्हणजे अनेक घातक रसायने व रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात शेती मधे वापर ! तरी त्या मधे पण त्याचे उत्पादन वाढतच नाही.या मागे काय कारण असु शकते हे पाहणे महत्त्वाचे आहे.मग ते असे होते की दुखणे असते हाताचे इलाज होतो पाया चां बरोबर ना !इलाज म्हणजे माती परीक्षण या मुळे होते असे की माती परीक्षणातून उत्पादन वाढीची समस्या सुटण्यास मदत होऊ शकते. बहुतेक शेतकरी याबाबत अनभिज्ञ असतात.आपल्याला जर मातीबद्दल माहिती घ्यायची असली तर आपन कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती येथे जाऊन किंवा आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्र यांच्या कडून माती परिक्षण करता येते. यातून आपणास जमिनीची सुपिकता कळणार असून त्यानुसारच पिकाची लागवड करणे सोपे होईल.आता सध्या खरिप हंगामाची लगबग सुरू झाली असेल. पेरणीसाठी शेतकरी बियाण्यांची जुळवाजुळव करीत आहे.मागच्या वर्षी बियाण्याचा तुटवडा होता व सोयाबीन जसे पाहिजे तसे पिकलेच नाही त्याच बरोबर कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव व मावा-तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी कोणत्या पिकाची व वाणाची लागवड करावी याबाबत शेतकरी खुप विचार करीत आहे. आपन पिकाची लागवड करतांना आपल्या जमिनीच्या सुुपिकतेची तपासणी केल्यास आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होउ शकतो.आपन जमिनीचे परीक्षण न करता वेगवेगळ्या प्रकाराची खते आणि कीटकनाशकांची फवारणी करतो नेमके तेच कारण आहे जमिनीचा पोत बिघडण्याचे. एकाएकी उत्पन्नात घट येते. म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपल्या साठी मातीची तपासणी करा.आपल्या तालुक्यातील कृषी विभागाने ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. आता शेतकऱ्यांनी जागृत होऊन खरिप हंगामापूर्वी माती परीक्षण करण्याची गरज आहे.व त्याच बरोबर ई पिकं करणे आपल्या साठी महत्त्वाचे आहे.दुसरे म्हणजे मातीची नोंदणी करावी.नेमके आता सर्व बाजूने सारख्या जाडीची माती वरपासून खालपर्यंत तासून ती स्वच्छ घमेल्यात गोळा करून गोणपाटावर ठेवावी. प्रत्येक खुणेजवळ खड्डे घेऊन एका शेतातून गोळा केलेली माती एकत्र मिसळावी. तिचे सारखे चार भाग करावेत.समोरासमोरचे दोन भाग वगळून उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून, त्याचे चार भाग करावेत. त्यानंतर पुन्हा समोरासमोरचे दोन भाग वगळावेत. अशा तऱ्हेने शेवटी दोन ओंजळी किंवा अर्धा किलोग्रॅम माती शिल्लक राहिली पाहिजे. हीच क्रिया करावी. आपन घेतलेल्या मातीच्या नमुन्यासोबत शेतकऱ्याचे नाव, गाव, जिल्हा, सर्व्हे गट नंबर आणि पुढील हंगामात घ्यावयाचे पीक याबाबत सविस्तर माहिती लिहून आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्र यांच्या येथे द्यावे मातीच्या संबंधित आपल्या तालुक्यातील माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावी.माती नमुना घेण्याची अशी आहे पद्धतनमुना काढण्यासाठी प्रथम शेतीची पाहणी करावी. जमिनीच्या प्रकारानुसार शेताचे विभाग पाडावेत. त्यानंतर जमिनीचा रंग, खोली, पोत, उंच व सखलपणा, पाणथळ किंवा ओलसर जागा आदी बाबींचा विचार करून प्रत्येक विभागातून स्वतंत्र प्रातिनिधिक नमूना घ्यावा. एका हेक्टरमधून १५ते २० ठिकाणची माती घ्यावी. नमूना घेण्यासाठी प्रत्येक विभागात नागमोडी रेषा काढून प्रत्येक वळणावर खड्डा घ्यावा. निवडलेल्या प्रत्येक ठिकाणाच्या जागेवरील काडीकचरा, दगड इत्यादी बाजूला करावेत. प्रत्येक ठिकाणी V व्ही आकाराचा खोलीचा खड्डा घेऊन त्यातील माती बाहेर काढून खड्डा मोकळा करावा.ओलसर जमिनीचे नमुने टाळावे मातीचा नमुना घेण्यासाठी विविध अवजारांचा वापर केला जाऊ शकतो. उदा. फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत. मातीचा नमूना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वीच घ्यावा. पिकास रासायनिक खत दिले असल्यास तीन महिन्यांच्या आत सदर जमिनीतून मातीचा नमूना घेऊ नये. निरनिराळ्या प्रकारची जमीन किंवा शेतातील मातीचे नमूने एकत्र मिसळू नयेत. माती नमूना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापरू नये. आज शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाड, विहिर पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमूने घेऊ नयेत हि दक्षता घेणे महत्त्वाचे आहे...बाका सर्व तुम्हाला माहिती आहेच.
धन्यवाद
मिलिंद जि गोदे
युवा शेतकरी
Save the soil all together
9423361185
milindgode111@gmail.com
Mission agriculture soil information
पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....
*पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा