नमस्कार मित्रहो थोडं पण सुचक आहे आपन जर आपल्या शेतातील मातीपरीक्षण करून घेतले तर स्फुरद, नत्र, आणि जस्त या मूलद्रव्यांची कमतरता किती प्रमाणात आहे हे समजून घेता येईल. मित्रांनो आपल्या शरीर आरोग्या प्रमाणेच जमिनिचे आरोग्य महत्वाचे आहे. आपले आरोग्य बिघडले की लगेच आपण डॉक्टरकडे जातो. तसेच जमिनीचेही तेच आहे. तिचे आरोग्य बिघडले तर ति कोठे जाणार ? जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा नादात आपन जमिनीच्या आरोग्य कडे लक्षच देत नाही. एक पीक काढले की लगेच दुसरे पीक काढायची जनुकाही स्पर्धा घेतआहे पुन्हा त्यात भर म्हणून मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर, यामुळे आपली जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. भविष्यात आपल्याला उत्पन्न मिळेल मात्र यात शेतीचे अतोनात नुकसान होईल हे शाश्वत सत्य आहे.
आपन बिघडवलेल वातावरण, कमी जास्त पाऊस तसेच रसायनाचा वापर यामुळे मातीचेआरोग्य बिघडले आहे. पुन्हा मी हात जोडून विनंती करतो जमिनीचे मातीपरीक्षण करा व शेतीचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करत रहा आपन जर असे केल्यास आपल्याला भरघोस उत्पन्न घेता येईल.जसे की माती परीक्षणा साठी आमचे कृषी विज्ञान केंद्र घातखेड कटीबद्ध आहे माती परीक्षणाची मोहीम सुरु केली आहे. शेतक-यांनी माती नमुन्याची तपासणी केली जाते. क्षारता, आॅरगॅनीक आर्यन, नत्र, पालाश, स्फुरद, तांबे, लोह, जस्त, मॅगनीज, बोरान, मातीच्या अशा विविध घटकांची तपासणी करतात.आपल्या जमिनीचा पोत सुधारायला हवा असे मला वाटते. माझे हेच एक मिशन आहे माती बद्दल जनजागृती करणे व सुपीकता कमी होण्याची कारण समजावून घेणे एकापाठोपाठ एकच पीक घेत राहतो, सूक्ष्म अन्नद्रव्य व रासायनिक खतांचा समतोल वापर थांबविणे गरजेचे आहे, शेणखताचा वापर नसणे या कारणामुळे आपल्या जमिनीची सुपीकता धोक्यात आली आहे. अजुन वेळ गेलेली नाही जमिनीच्या सुपीकेतेसाठी प्रत्येक शेतक-याने आपल्या शेतातील मातीचेपरीक्षण हे करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मातीपरीक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त होईल..... धन्यवाद
आपला मित्र मिलिंद जि गोदे
Mission agriculture soil information
milindgode111@gmail.com
9423361185
9403082042
विचार बदला जिवन बदलेल....
पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....
*पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा