नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे शेतीवर आणी उत्पादनामध्ये होणारी घट यामागचे कारण काय असु शकते ते या लेखाच्या माध्यमातून उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहे. आपन उत्पादन वाढीसाठी कीटकनाशक, तणनाशक व खते वापर करतो त्यांचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून येतात. या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात जाणवले नव्हते परंतु आज सर्वांनाच मोठ्या प्रमाणात ते जाणवत आहेत. खरे म्हणायचे तर दुष्परिणाम होतच आहे पन कीटकनाशक, खते, तणनाशक यांच्या वापरामुळे शेतजमिनी वर खुप परिणाम तर मिळणाऱ्या उत्पादनावर दुष्परिणाम होत आहे. त्यांचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे रासायनिक कीटकनाशक, खते, तणनाशक यांचा होणारा अतिप्रमाणात वापर! आपन शेतात पिकांवर येणाऱ्या रोग आणि कीटकांना मारण्यासाठी साठी मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत असतो. ज्यामुळे त्वरित कीड व रोगांचा नाश तर होतोच, परंतु त्यामुळे रासायनिक कीटकनाशकाचे अंश पिकांवर व जमिनीवर सोबतच वातावरणात राहतो हे अति प्रमाणात परिणाम करणारे आहे. त्यामध्ये उत्पादन, जमीन व वातावरणावर कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो. हा होणारा दुष्परिणाम जास्त कालावधीसाठी असतो हा परीणाम लवकर भरता येणारा नसतो. म्हणून रासायनिक कीटकनाशकांचा जास्त प्रमाणात वापर टाळणे हे आवश्यक आहे.उद्याला होणारे दुष्परिणाम टाळणे अवघड आहे आणि ते आपल्यासाठी तर हानिकारकच आहेत, परंतु येणाऱ्या पिढ्यांसाठी देखील जास्त प्रमाणात हानिकारक आहेत. पुढच्या पिढीला चांगले वातावरण,जमीन व उत्पादन देणे हि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपल्याला वेळीच या सर्व गोष्टी थांबवणे आवश्यक व गरजेचे आहेत त्यांची आता पासूनच अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आपन आपल्या जमिनीत खते व तणनाशकेही रासायनिक पद्धतीची वापरतो . त्यांचा जमिनीवर, पिकांवर व वातावरणावर मोठ्या प्रमाणात नुकसानकारक दुष्परिणाम दिसून येतो. शेतामध्ये ज्यावेळी बियाण्यांची पेरणी करायची असते त्या आधी जमिनीत मोठ्या प्रमाणात रासायनिक खते टाकले जातात. या बरोबरच पेरणीच्या वेळी काही मात्रा रासायनिक खतांची दिली जाते. त्या नंतर काही मात्रा विविध पिकांच्या वाढीच्या वेगवेगळ्या कालावधीत दिल्या जातात. वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवगळ्या कारणांनी विविध खते व औषधांच्या वेगवेगळ्या मात्रा या वेगवेगळ्या कारणांसाठी दिल्या जातात. म्हणजे उत्पादनाच्या वाढीसाठी तसेच काही गोष्टींची पिकांमध्ये कमतरता असेल तर ती भरून काढण्यासाठी खतांचा पुरवठा केला जातो. यामध्ये अनेक खते हि पाण्याबरोबर देखील दिली जातात. वेगवेगळ्या पद्धतीने दिली जातात. हे सगळे जमीन, पिक व वातावरण कसे आहे इत्यादी सर्व गोष्टीवर ठरत असते कि कोणत्या प्रकारे खते देणे हे लाभकारक ठरेल. या सर्वांमध्ये हि खते रासायनिक पद्धतीची असतात त्यामुळे यांचा तात्काळ लाभ झालेला दिसून येतो. परंतु हा तात्काळ झालेला लाभ दूरगामी नुकसानकारक आहे. कारण यामुळे अनेक प्रकारचे दूरगामी वाईट परिणाम होत असतात. हे सगळे टाळायचे असेल तर सेंद्रिय खतांचा वापर करणे हि आज काळाची गरज बनली आहे. यामुळे कुठल्याही प्रकारचे चुकीचे दुष्परिणाम होत नाहीत हेही तेवढंच महत्वाचं! आता तणनाशक हे अनेक प्रकारचे बाजारात उपलब्ध आहेत त्यामध्ये ज्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो ते जे जमिनीवर, वातावरणावर व पिकांवर देखील दुष्परिणाम करतात. या ऐवजी शेतात येणाऱ्या तणांचा योग्य प्रकारे उपयोग जमिनीसाठी केला जावू शकतो. त्यामध्ये जे अपायकारक तन आहेत त्यांचा नाश करावा. जे तन फक्त मुख्य पिकाच्या पोषणास बाधा आणत आहेत, अशा तनांची काढणी करून ते एका ठिकाणी गोळा करून वाळू द्यावे. उन्हाळ्यात जेव्हा जमिनीची धूप होत असते त्या वेळी पिकांच्या सरीत जर हे वाळलेले गवत पसरविले तर जमिनीची होणारी धूप मोठ्या प्रमाणात थांबविली जावू शकते. असे एक नाही अनेक उपाय आहेत ज्यातून शेतातील तणही काढले जाते व त्याचा सदुपयोग देखील केला जातो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....

सहज व शक्य शेती...... मिलिंद जि गोदे