नमस्कार मंडळी वनस्पती संजीवकाची माहीती व कार्य *ऑक्‍झिन्स* यांच्या वापरामुळे वनस्पतीच्या पेशींची लांबी वाढते उदा.- आय.ए.ए., आय.बी. ए. कलम करताना भिन्न वनस्पतींच्या पेशींचा एकजीव करण्याचा उद्देश असतो. फळपिके, विविध शोभेच्या झुडपांच्या व फुलझाडांच्या अभिवृद्धीमध्ये ऑक्‍झिनचा वापर यशस्वितेने करता येतो. पानांवर व फळांवर ऑक्सीनची फवारणी केल्यामुळे फळांची व पानांची अकाळी गळती टाळता येते. द्राक्षाची बियाविरहित प्राप्त करण्यासाठी ऑक्सिनचा वापर केला जातो. वनस्पतीच्या छाट कलमांना मुळे फुटण्यासाठी, तसेच मुळांच्या संख्येत गुणात्मक वाढ करण्याकरता अंजीर, सफरचंद, अननस, पीच, चहा, गुलाब, बोगनवेलिया, रबर इत्यादी झाडांच्या छाट कलमांना मुळे फुटण्यासाठी केला जातो. एन.ए.ए.च्या वापरामुळे टोमॅटो, वांगी, अंजीर यांची फळधारणा सुधारून उत्पन्न वाढते, तर एनएए मुळे सफरचंदाच्या फुलांची विरळणी होऊन उरलेल्या फळांचे आकारमान वाढते व त्याचा रंग व दर्जा सुधारतो.सर्व पिकांवर हे फुलगळ रोखण्या साठी व फ्लावरींग वाढीसाठी वापरले जाते . नैसर्गिक रित्या हे फुलावर येत असलेल्या अवस्थेत वनस्पतीत असते तसेच गोमुत्र अंकुरीत सप्तधान्य अर्क , ताक, दुध, गारबेज एंझाईम, ffg, वनस्पती संजीवकात असते. *सायटोकायनिन्स* या संजीवकांच्या अंगी वनस्पती पेशी विभाजनाची क्षमता आढळते उदा.कायनेटिन पेशींची वृद्धावस्था टाळणे, बीज अंकुरणासाठी बिजांची सुप्तवस्था लवकर संपविणे. प्रकाशसंश्लेषण योग्य प्रकारे करणे इ. सायटोकायनिन्स उपयोगी ठरते. नैसर्गिक सायटोकायनिन मध/शहद यात असते. *जिबरेलिन्स* या संजीवकांत पेशी विभाजनाची व त्यांची लांबी वाढविण्याची अथवा या दोन्ही क्रिया करण्याची क्षमता आढळते. नैसर्गिक रित्या हे गव्हाकुंरात असते. याला शेणखतात व गांडूळ खतात पण वाढवता येते. बीजाची सुप्तावस्था मोडण्यासाठी जिब्रेलिन्स गटातील संजीवकामध्ये बिया काही काळ भिजविल्यास बियांची उगवण चांगली व लवकर झालेली आढळते.वाढिचा वेग वाढवणे तसेच बियाविरहीत फळ प्राप्त करण्यासाठी जिबरेलिन्स उपयोगी आहे. काकडीवर्गीय पिकांमध्ये फळधारणेसाठी स्त्रीलिंगी फुलापासून फळे मिळतात म्हणून पुल्लिंगी फुलांचे प्रमाण व वाढ कमी करून स्त्रीलिंगी फुलांची संख्या अधिक प्रमाणात व लवकर आणण्यासाठी जिब्रेलिक वापरतात. *वाढरोधक संजिवक* वनस्पतीच्या शरीरांतर्गत चालणाऱ्या क्रिया कमी करण्याची अगर पूर्णपणे थांबविण्याची, नियंत्रित करण्याची क्षमता या गटातील संजीवकांच्या अंगी आढळते.काही पिकांमध्ये फलधारणा प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने विरळणीची गरज भासते पिकांचे उत्पन्न व दर्जा वाढविता येत असल्याने त्यांचा वापर करणे फायदेशीर ठरते बऱ्याच वेळा हवामान, सूर्यप्रकाश यातील बदलांमुळे अथवा नैसर्गिक हंगामात फांदीच्या टोकास वाढ, संजीवकाचे जादा प्रमाण तयार झाल्याने फळझाडांना बहर निघत नाही. त्याकरिता द्राक्ष, अंजीर, डाळिंब, लिंबू, संत्रा, मोसंबी यांसारख्या फळझाडांवर हवामान व त्यांची शारीरिक अवस्था लक्षात घेऊन वाढरोधक गटांतील संजीवकांचा क्रमाने केलेला वापर परिणामी बहर काढण्यात मदतीचा ठरतो. *ॲवसिसीक ॲसिड* हे वाढ रोधक संप्रेरक आहे. यामुळे पेशींना वृद्धवस्था येते. अति प्रखर उन्हात पानगळ करुन बाष्पोच्छवास थांबवुन पाण्याची बचत करण्यासाठी हे फायदेशिर आहे. हे पाने गळण्या आधी पाने पिवळी पडतात त्या अवस्थेत असते. *इथिलीन* हे वाढ रोधक संप्रेरक आहे वनस्पतीमधील इतर संप्रेरकांपैकी इथिलीन फक्त इथिलीन नैसर्गिक स्थितीत वायुरुपात असत. फळांचा परिपक्व होण्याचा कालावधी कमी करण्यासाठी (फळे लवकर पिकवण्यासाठी) हे उपयोगी आहे. हे फळ परिपक्व झाल्यावर फळातुन न वायुरूपात निघुन फळाला पिकवते. Mission agriculture soil information.... milindgode111@gmail.com मिलिंद जि गोदे युवा शेतकरी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....

सहज व शक्य शेती...... मिलिंद जि गोदे