पर्यावरण आणि नियोजन
नमस्कार मंडळी मी मिलिंद जि गोदे आज जागतिक पर्यावरण दिवस आहे आज या गोष्टीला विसरून चालणार नाही कि पर्यावरण मुळे हे सर्व जिवसृष्टी आहे. मुख्यतः आपली शेतीचा सर्वाधिक भाग मोसमी पावसावर अवलंबून आहे तसेच हवामानातील नवनवीन बदलांमुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. कधी पाऊस तर कधी कोरडा दुष्काळ या मुळे शेती उत्पादनामध्ये चढउतार होण्याचे मुख्य कारण म्हणजे कमी कींवा जास्त पाऊस हेच कारण आहे. या गोष्टी च्या व्यतरीक्त असामान्य तापमान, रोग आणि किडींचा प्रकोप, अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, गारपीट ही कारण तर शेतकर्यासाठी आहेतच.गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र सर्वांना करण्याइतके बिघडले आहे. अतिवृष्टी आणि कोरडा दुष्काळ या दोन्ही गोष्टी शेतीसाठी अभिशाप ठरल्या आहेत.
गेल्या काही वर्षांमधील कमी पावसामुळे जे दुष्परिणाम शेतीवर झाले, ते अलीकडच्या काळात अधिक गडद झाले आहेत. मुख्य म्हणजे जलवायू परिवर्तन आणि तापमानवाढीचा परिणाम म्हणून पूर आणि दुष्काळ वारंवार समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे येणार्या काळात शेतीचे नुकसान आणखी वाढण्याची भीती आहे.
खरिपाच्या पिकाला अवर्षणाचा फटका बसतो, तर रब्बीच्या पिकाने नुकसान भरून काढावे तर तेव्हा अवकाळी पाऊस पिकांचे नुकसान करून जातो. एक अंश तापमान जरी वाढले तरी गव्हाचे उत्पादक घटेल.
जलवायू परिवर्तनामुळे फळांचेही उत्पादन घटेल. केवळ उत्पादनच घटेल असे नाही, तर त्यांची गुणवत्ताही कमी होईल. अन्नधान्यातील पोषक घटक आणि प्रथिने कमी होत जातील. परिणामी अन्न सुरक्षीत व संतुलित राहणार नाही आणि आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येईल हे तेवढं खरं आहे
दुसरीकडे वेगाने वाढत जाणार्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य मागणी वाढत जाणार आहे. त्यामुळे नैसर्गिक स्रोत संपुष्टात येणार या स्रोतांचा अतिवापर केल्यामुळे पर्यावरणाचे चक्र बिघडले आहे. पर्यावरणात होत असलेल्या परिवर्तनाचा थेट परिणाम शेतीवर पडणार आहे. कारण तापमान आणि पावसात बदल झाल्यामुळे मातीची उत्पादकता कमी होत जाते आणि किड रोगांचा प्रसार होण्याचा धोका वाढतो. किडींचा फैलाव अधिक वेगाने झाल्यामुळेही उत्पादन घटणे हे साजेसे आहे.यावर्षी सर्वसाधारण पाऊसमान राहील,म्हणजेच सरासरी पाऊस यंदा पडण्याची शक्यता आहे. वाढते प्रदूषण आणि आपन नैसर्गिक स्रोतांचा अतिउपसा केल्यामुळे पर्यावरणात बदल घडत असून त्याचा शेतीवर आणि पिकांवर प्रतिकूल परिणाम होणे निश्चित आहे. पावसाळ्याचे दिवस पूर्वी अधिक होते, ते आता कमी झाले आहेत.हे सांगायला नवीन नाही.
एकाच दिवशी अधिक पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा स्थितीत शेतकर्यांनी सतर्क राहणे गरजेचे बनले असून शेतकर्यांना हवामानाची अचूक माहिती वेळेवर मिळणेही गरजेचे बनले आहे.पर्यावरणातील अनेक बदल शेतीवर थेट परिणाम करणारे आहेत. सरासरी तापमानातील वाढ हा पहिला बदल होय. गेल्या काही दशकांत तापमानात सातत्याने वाढ होत आहे. अनेक वनस्पतींच्या प्रजातींना वाढीसाठी विशिष्ट तापमान असणे आवश्यक असते. वातावरणाचे तापमान वाढल्यामुळे त्यांच्या उत्पादकतेत प्रचंड घट होते. शेती ज्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणी तापमान वाढल्यानंतर ही शेती होऊ शकणार नाही.
कारण या पिकांमध्ये दाणे तयार होण्याची प्रक्रिया विशिष्ट तापमानातच होते. तापमान वाढल्यास दाणे कमी प्रमाणात तयार होऊन उत्पादन घटते. तापमान असेच वाढत राहिल्यास ही पिके घेणे अवघड होऊन बसेल. अतिरिक्त तापमानवाढीमुळे पावसावर प्रतिकूल परिणाम होतो.
पाऊस कमी पडल्यामुळे मातीतील आर्द्रता कमी होते. जमिनीच्या तापमानात सतत चढउतार होत राहिल्यास प्रक्रिया सुरू होता. तापमानवाढीमुळेच दुष्काळाची परिस्थिती उद्भवत असते.पावसाचे प्रमाण आणि स्वरुपात झालेला बदल हाही पिकांवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. पाऊस कमी पडल्यास जमिनीतील ओलावा नष्ट होत जातो तर एकाच वेळी अधिक पाऊस पडल्यास मातीची धूप होऊन जमीन नापीक बनू लागते. पावसाचा हीशेतीवर प्रचंड परिणाम होतो.
शेतातील सर्वच्या सर्व पिकांना जगण्यासाठी विशिष्ट प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. पाऊस तर शेतीसाठी महत्त्वाचा आहेच, पण तो वेळेवर आणि योग्य प्रमाणात पडणेही आवश्यक आहे.वातावरणातील बदलांमुळेही शेती अडचणीत येत आहे. त्याच प्रमाणात मानवी जीवन आणि अन्नधान्याच्या उत्पादनावरही परिणाम होत जातो.तापमानवाढ आणि जलवायू परिवर्तनाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकर्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शेतात जलव्यवस्थापन आणि सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. जमिनीची धूप रोखण्याबरोबरच पावसाचे पाणी उपयोगात आणण्यासाठी जलसंवर्धन हा दुहेरी उपयोगाचा मार्ग ठरतो. पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमातून आपण पावसाचे पाणी अडवून शेतीसाठी उपयोगात आणू शकतो.
शिवाय त्यामुळे मातीची धूपही थांबते. त्याचवेळी साठलेले पाणी जमिनीत मुरून भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होते. त्याचा पुन्हा शेतीसाठी उपयोग होतो. सेंद्रीय आणि नैसर्गिक शेती करणे आता काळाची गरज बनली आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके जमिनीच्या उत्पादकतेत घट करणारी ठरली आहेत. त्यामधील विषारी घटक अन्नसाखळीत समाविष्ट होऊन अन्नावाटे पोटात जाऊन आरोग्याचेही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे निसर्गाचे चक्र आणखी बिघडते. त्यामुळे आपल्याला जैविक आणि संमिश्र शेतीचा अवलंब यापुढील काळात करावा लागणार आहे. एकल शेतीऐवजी एकात्मिक शेतीतंत्राचा वापर करण्यामुळे जोखीम कमी होते.शेतीत अनेक पिकांचे उत्पादन एकाच वेळी घेतले जाते. नैसर्गिक प्रकोपामुळे एखादे पीक हातचे गेले तरी इतर पिकांमधून शेतकर्याला उत्पन्न मिळू शकते.जलवायू परिवर्तनाचे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेता पीक उत्पादनात नवनवीन पद्धतींचा अवलंब यापुढे करावा लागणार आहे. पेरणीच्या वेळेतही यापुढे बदल करावा लागेल, असे बिघडलेल्या पर्जन्यचक्रामधून लक्षात येते. शेतकर्याने आपले पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्राच्या समन्वयातून संकटावर मात करायला शिकले पाहिजे. संमिश्र शेती आणि आंतरपिके घेऊन जलवायू परिवर्तनामुळे निर्माण झालेल्या धोक्यापासून काही प्रमाणात बचाव करता येऊ शकतो.जलवायू परिवर्तनाच्या दुष्टचक्रापासून बचाव करण्यासाठी सर्वात आधी आपण उपलब्ध नैसर्गिक स्रोतांचा काटकसरीने आणि नियोजन बद्ध वापर करायला शिकले पाहिजे. त्यासाठी पारंपरिक ज्ञानाचा वापरच फलदायी ठरणार आहे.शेतीमध्ये पर्यावरणस्नेही पद्धतींचा वापर यापुढील काळात करणे गरजेचे बनले आहे. असे केल्यास आपण जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवण्याबरोबरच नैसर्गिक स्रोतांचेही रक्षण आणि पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो.... धन्यवाद *शेती मधे विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल* *मिलिंद जि गोदे*. milindgode111@gmail.com. *Save the soil all together*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा