*नमस्कार मित्रांनो थोडक्यात समजून घेऊ*
*NPK म्हणजे काय?*
Nitrogen (N) Phosphorus (P) Potassium (K). नैट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशिअम. NPK हि त्यांची शास्त्रीय नावे आहेत. NPK हे महत्वाचे पोषक घटकं असून त्याची पिकांना गरज असते हे घटक शेतातील मातीतून मिळत असतात त्याच बरोबर आपण काही रासायनिक आणि सेंद्रिय खताद्वारे हि ते देत असतो. हे घटक इतके महत्वाचे असतात कि याविना पिकांची नीट वाढ होऊ शकत नाही. NPK मधला प्रत्येक घटक वेगवेगळी जबाबदारी पार पाडत असतो. ती आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत.
*नत्र Nitrogen (N):*
नत्र हे पिकाच्या पानांची वाढीसाठी जबाबदार असतात. म्हणजेच नत्र दिल्याने पिकांची पानांची वाढ चांगली होते पाने हिरवी गार राहतात. ज्याप्रमाणे प्रथिने (proteins) मानवाच्या शरीराला उपयोगी असतात त्याच प्रमाणे पिकांना हि त्याची गरज असते. ती प्रथिने नत्रा मधून मिळत असतात. जर पिकांची पाने पिवळी दिसत असतील तर नत्राची कमतरता आहे असेल समजावे लागेल. पेशी विभाजनामध्ये नत्राचा उपयोग होत असतो.
*स्फुरद Phosphorus (P) :*
स्फुरद हा घटक पिकांच्या मूळ वाढीसाठी त्याच बरोबर फुलं आणि फळं वाढीसाठी गरजेचं असतो. पिकाच्या प्रजनन चक्रामध्ये स्फुरद अत्यंत गरजेचं असत. स्फुरद मुळे प्रकाश संश्लेषण क्रिया उत्तम प्रकारे होत असते आणि यामुळेच पिके कार्बन डायॉक्साइड घेऊन आक्सीजन तयार करण्याचे काम चांगल्या प्रकारे करत असतात. नत्र प्रमाणेच स्फुरद पण पेशी विभाजनाचे काम करत असते.
*पालाश Potassium (K)*
पिकांच्या पानामध्ये छोटे-छोटे छिद्र असतात हि छोटी छिद्र प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी उघड - बंद होत असतात ज्याच्या वाटे पिके कार्बन डायॉक्साइड घेऊन आक्सीजन तयार करण्याचे काम करत असतात. पिकांना पालाश योग्य प्रमाणात दिल्यास हि छोटी छिद्र योग्य प्रकारे उघड-बंद होतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेचे काम योग्य प्रकारे होते. या पाना वाटे तयार झालेले अन्न योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य करते ....
धन्यवाद
*मिलिंद जि गोदे*
*Mission agriculture soil information*
पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....
*पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा