जिवामृत का महत्वाचे आहे.... मिलिंद जि गोदे
नमस्कार मंडळी .... अनेकदा आपन जिवामृत चावापर आपल्या शेतात करतो.त्याचे कार्य काय आहे व वापर कसा करावा व का करावा त्यामुळे आज सर्व प्रश्नांचे उत्तर या लेखात मिळणार आहे आमच्या घरी वडिलोपार्जित जनावरें पाळली जात आहे.ती परंपरा आम्ही पुढे जपत आहे कारण गायीचे निघणारे दुध व त्यापासून दही व तुप हे सर्वात आवडते पदार्थ आहेत मी नेहमी गोमुत्र साठवुन शेतीत विविध प्रयोग करत असतो. गायीच्या शेणाचा व गोमुत्राचा वापर करुन जैविक शेतीचा प्रयोग मि माझ्या शेती वर केलेला आहे. या अनुभवातुन एक गोष्ट शिकलो एखाद्या तंत्राचे ताबडतोब फायदे मिळतात म्हणुन कोणत्याही शास्त्रीय अभ्यासा शिवाय ते तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरणे म्हणजे एक धुळफेक म्हणावं लागेल. आज युवा पिढीसमोर शेती साठीआलेले जैविक तंत्रज्ञान खरे पाहिले तर खुप जुने आहे पण हे त्यांना कोणीतरी सांगायची गरज आहे.जिवाणुंच्या वाढीसाठी बनविलेली स्लरी म्हणजे जिवामृत ! स्लरी तयार करायच्या तिसऱ्या दिवसानंतर चिलेशन होण गरजेच आहे. म्हणजे गायीच्या शेणाचे ७ दिवसांत आबंवन किंवा कम्पोस्ट करुन त्याद्वारे जैविक मॅटर व बायोमास बनविने हे खरे तंत्र आहे. याप्रक्रियेमध्ये तयार ...